‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका अनेक नवनवीन ट्विस्ट्समुळे प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत रुपालीच्या वशमधून सगळे बाहेर आल्यानंतर एक नवीन ट्विस्ट आला असल्याचे पाहायला मिळत आहे आणि हा नवीन ट्विस्ट म्हणजे नेत्राच्या आई होण्याचा. मालिकेत नेत्राने नुकतीच आई होणार असल्याची खुशखबर दिली आहे. त्यामुळे राजाध्यक्षांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे.
मालिकेच्या कालच्या भागात नेत्राच्या आई होणार असल्याचा आनंद साजरा करण्यासाठी राजाध्यक्ष कुटुंबीय हॉटेलमध्ये जातात. यावेळी कुटुंबातील प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यातील या नवीन सुरुवातीबद्दल आपापली मते व्यक्त करतात. सगळेजण याबद्दल नेत्रा व इंद्राणी यांचे आभार मानतात. तसेच अद्वैतही वडील होण्याचा आनंद व्यक्त करतो. यानंतर सगळेजण आनंदाने नाचत त्यांचा आनंद व्यक्त करतात.
त्यानंतर ते घरी येताच सर्वांना मोठा धक्का बसतो तो म्हणजे रुपाली घरी असल्याचा. राजाध्यक्ष कुटुंबीय जेवून घरी येताच त्यांना सोफ्यावर रुपाली दिसते. तिचा बदललेला लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तसेच यावेळी रुपाली तिच्या निधन झालेल्या सासूच्या फोटोकडे पाहून रडत असते. “तुम्ही आम्हाला अशा सोडून का गेलात? या मधल्या काळात काय झालं?” असं म्हणते. मात्र ही सगळी रुपालीची चाल असल्याचे नेत्रा ओळखते व तिला “विरोचका तू जीवंत कसा?, माझी चूक झाली तुला जीवंत ठेवले” असं म्हणते.
यानंतर रुपाली “तुम्हाला मी नकोच असेल तर मी निघून जाते” असं म्हणून राजाध्यक्षांच्या घरातून रुपाली निघून जाते. यानंतर घरातील सगळेच नेत्रा व इंद्राणी यांना रुपाली जीवंत असल्याबद्दल विचारतात. तसेच नेत्रा व इंद्राणी या दोघींनाही विरोचक जीवंत असल्याबद्दल प्रश्न पडतो. यानंतर शेखरला त्याच्या रुममध्ये रुपालीचा गजरा दिसतो. तेव्हा केतकी काकू शेखरला रुपालीबद्दल विचारते. यावर शेखर “नेत्रा, इंद्राणी व अद्वैत यांना येऊदे मग काय ते बघू” असं म्हणतो.
आणखी वाचा – लीलाने विश्वासघात केल्याचा एजेंचा आरोप, बायको म्हणून स्वीकारणार का?, सूनांचा निर्णय काय असणार?
अशातच अद्वैतला एक फोन कॉल येतो. यानंतर ते अचानक हॉस्पिटलमध्ये धावत जातात. हॉस्पिटलमध्ये जाताच त्यांना रुपाली दिसते आणि तिला पाहून त्या दोघांनाही धक्काच बसतो. त्यामुळे आता विरोचक पुन्हा जीवंत झाला आहे का? की विरोचक पुन्हा काही नवीन डाव खेळत आहे? असा प्रश्न पडला आहे. एकीकडे नेत्राच्या गरोदरपणाच्या बातमीने सर्व आनंदी आहेत. तर दूसरीकडे रुपाली घरात आल्याने तिच्याविषयी सर्वांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे मालिकेत आता पुढे काय होणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.