झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अप्पी व अर्जुन हे सात वर्षांनी आता पुन्हा एकदा एकत्र येत असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र वडिलांच्या इच्छेखातर अर्जुनने दुसरा साखरपुडा केलेला पाहायला मिळत आहे.
अर्जुनच त्याचा बाबा असल्याचे सत्य आता अमोलला समजलं आहे. शिवाय बाबांच्या घरच्यांची आणि त्याच्या माँची भांडणं झाली असल्याचेही अमोल समोर आलेलं आहे. त्यामुळे आता या दोन्ही घरांना एकत्र आणण्यासाठी अमोल स्वतः कष्ट घेताना दिसत आहे. मालिकेत नुकताच याबद्दलचा नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
अशातच आता या मालिकेचा आणखी एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये अमोल अप्पीच्या वडिलांना त्याने काढलेले चित्र दाखवत आहे. यामध्ये अमोल त्याने अप्पी व अर्जुनचे चित्र काढले असल्याचे सांगतो. इतक्यात तिथे अप्पी येते व मोनाला दिप्या दिसत नसळचे विचारते व टग्याला तातडीने फोन करून घरी बोलवायला सांगते.
आणखी वाचा – लीलाने विश्वासघात केल्याचा एजेंचा आरोप, बायको म्हणून स्वीकारणार का?, सूनांचा निर्णय काय असणार?
यादरम्यान, अमोल अप्पीला त्याने काढलेले चित्र बघण्यासाठी सांगतो. मात्र, अप्पी अमोलकडे नजरअंदाज करत त्याने काढलेले चित्र चांगले चांगले असल्याचे म्हणते. अमोल अनेकदा तिला मी काढलेले चित्र बघण्यासाठी सांगतो. मात्र अप्पी त्याचे चित्र न बघताच सुंदर आहे छान आहे असं म्हणते.
आपण काढलेले चित्र अप्पी माँ बघतच नाही आहे. चित्र न बघताच ती फक्त “छान आहे सुंदर आहे” असं म्हणते आहे. हे बघून अमोललं वाईट वाटते. अमोलने काढलेले चित्र हे खरच अमोल व अर्जुनचे आहे का? अमोलने काढलेल्या चित्रामुळे अर्जुनविषयीचे सत्य त्याला समजले असल्याचे अप्पीला कळणार का? हे मालिकेच्या पुढील भागात पाहायला मिळेल. त