शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दारू प्यायले, रक्ताच्या उलट्या झाल्या आणि…; दोन वर्षांची असताना भारती सिंगच्या वडिलांचे झालेले निधन, अभिनेत्रीला त्यांची एकही आठवण ठेवायची नाही कारण…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 22, 2025 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bharati Singh Mother Father

दारू प्यायले, रक्ताच्या उलट्या झाल्या आणि…; दोन वर्षांची असताना भारती सिंगच्या वडिलांचे झालेले निधन, अभिनेत्रीला त्यांची एकही आठवण ठेवायची नाही कारण…

Bharati Singh Mother Father : सध्या कॉमेडी क्वीन भारती सिंग चर्चेत आलेली पाहायला मिळाली आहे. भारतीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे ती चर्चेत आली आहे. इतकंच नाहीतर या मुलाखतीदरम्यान भारतीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खुलासे केले. नेहमीच सर्वांना हसवणारी भारती सिंगने तिच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. यावेळी या गोष्टीचा खुलासा झाला की, एखाद्या गोष्टीला ती इतकी घाबरते की ती तिच्या मनातून जात नाही. या मुलाखतीदरम्यान भारतीने तिला विमानप्रवासाचा फोबिया असल्याचं स्पष्ट केलं. विमान अपघातानंतर ती पावसाळ्यातील विमानप्रवास शक्यतो टाळते.

भारतीने सांगितलं की, “ती पावसाळ्याच्या ४ महिन्यांमध्ये कामही घेत नाही कारण तिला विमान प्रवासाची भीती वाटते. याशिवाय, तिनं असंही सांगितलं की, आता ती संपूर्ण कुटुंबासह कुठेतरी जाणार आहे. म्हणून तिनं ठरवलं की, तिचं कुटुंब २ विमानांमध्ये जाईल”. यावेळी भारतीने असं करण्यामागचं कारण सांगत गमतीनं म्हटलं की, “जर आपण एका विमानात गेलो तर मागे सही करणारे कोणीही नसेल”. यानंतर, भारतीला विचारण्यात आलं की तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी भीती कोणती आहे? यावर अभिनेत्री म्हणाली, “मला माझ्या आईची सर्वात भीती वाटते. मला माझ्या आईच्या मरणाची भीती वाटते”.

आणखी वाचा – अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडलं, रक्ताच्या धारा वाहिल्या आणि…; ‘देवमाणूस ३’मध्ये ‘असा’ शूट झाला सीन, bts video समोर

आईबाबत बोलताना भारती म्हणाली, “मला असं वाटतंय की, मी माझ्या आईशिवाय श्वास घेऊ शकणार नाही. गेल्या वर्षी माझी आई खूप आजारी पडली. तिला किडनीचा त्रास होता म्हणून तिचं ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं. तेव्हापासून मी मॅनिफेस्ट करायला सुरुवात केली”. भारतीने सांगितलं की, जेव्हा तिच्या आईची शस्त्रक्रिया सुरु होती, तेव्हा तिला वाटलं की, जेव्हा ती बरी होईल तेव्हा ती आईबरोबर जगन्नाथ पुरीला दर्शनासाठी जाईल. ट्रान्सप्लांट केल्याच्या १ वर्षानंतर तिला जे वाटलं होतं ते घडलं. भारती म्हणाली की, ती तिच्या आईला देव मानते. जर तिला तिचा मार्ग मिळाला तर ती तिच्या आईसाठी एक मंदिर बांधेल आणि तिथे तिची मूर्ती ठेवेल.

आणखी वाचा – “माझ्यावर घाणरेडे विनोद करुन प्रसिद्धी मिळवली”, अभिनेत्रीचा कपिल शर्माला टोला, म्हणाली, “त्याचं वाईट…”

भारतीने मुलाखतीमध्ये तिच्या वडिलांबद्दलही सांगितलं. भारती केवळ दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यांना कॉलरा झाला आणि त्यात ते दारु प्यायले. त्यानंतर त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. भारती पुढे म्हणाली, की आजही जर कोणी तिच्या घरात तिच्या वडिलांचा फोटो लावला तर तिला तो काढून टाकावासा वाटतो. भारतीने तिच्या वडिलांना कधीही पाहिलं नाही, म्हणून ते तिला अनोळखी वाटतात. म्हणूनच तिच्या घरात तिच्या वडिलांचा फोटो नाही कारण तिला तिच्या वडिलांची एकही आठवण नाही.

Tags: Bharati Singhbharati singh familyentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Next Post
lakshmikant berde daughter swanandi berde New Business

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लेकीचं व्यवसायात पदार्पण, स्वानंदीने लाँच केला स्वतःचा ब्रँड, नावही आहे खास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.