Bobby Darling Interview : बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांवर आणि छोट्या पडद्यावर काम करणारी ट्रान्सजेंडर अभिनेत्री बॉबी डार्लिंग बहुतेकदा तिच्या निर्दोष शैलीसाठी ओळखली जाते. अभिनेत्री आता सिनेविश्वपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय आहे. एकेकाळी, अनेक बी टाउन फिल्म्स आणि ‘बिग बॉस’ यासह अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम करुन तिने प्रेक्षकांमध्ये आपली छाप पाडली. आता बॉबी डार्लिंग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
खरंतर, अलीकडेच तिने एक मुलाखत दिली आहे, ज्यात तिने आपल्या वैयक्तिक-व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला. या दरम्यान, बॉबीने कॉमेडियन-अभिनेता कपिल शर्मावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तो म्हणतो की, कपिलने एकाच वेळी त्याचे नाव वापरुन बरेच पैसे कमावले आहेत. इतकेच नव्हे तर तिने हे देखील सांगितले की, तिने त्याकडे काम मागितले होते पण त्याने याला काहीच उत्तरही दिलं नाही.
आणखी वाचा – “नोरा फतेहीसारखी फिगर हवी”, नवऱ्याच्या मागणीने पत्नी त्रस्त, दिवस-रात्र जिमला पाठवायचा, उपाशी ठेवायचा आणि…
मुलाखतीत पहिल्यांदा बॉबीने सांगितलं की, कपिलने तिची नक्कल करुन आणि घाणेरडे विनोद करुन खूप पैसे आणि प्रसिद्धी मिळवली. पण जेव्हा तिनं कपिलकडे काम मागितलं तेव्हा त्याने तिला काम दिलं नाही. त्यामुळे कपिल शर्मावर बॉबीचा खूप राग आहे. त्याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली की, “मी कपिलकडे काम मागितलं, मला त्याबदल्यात पैसेही नको होते पण मला कामाची गरज होती. मात्र, त्याने मला काम देण्यास नकार दिला”.
जेव्हा बॉबीला विचारलं गेलं की, तू कपिल शर्माला कामासाठी मॅसेज केला होता का? यावर बॉबी म्हणाली, “त्या मॅसेजच अजूनही उत्तर आलेलं नाही. पण देवाने उत्तर दिलं आहे. त्याच्या कॅफेवर हल्ला होत आहे. देव पाहत आहे, मी काम मागितलं पण त्याने मला नकार दिला. बघ, तुझं काहीतरी वाईट होईल. जो माणूस कोणाचंही भलं करु शकत नाही, ज्याला कामाची अत्यंत गरज आहे, त्याला किमान एक मॅसेज करुन सांगायचं मी सध्या कामात आहे, काम झालं की नंतर फोन करेन. मात्र, यामुळे मी खूप धाडसी बनले आहे. तू मला पाहिलंस आणि माझ्याकडे दुर्लक्ष केलंस जसंकी मी निर्जीव आहे”.





