शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लेकीचं व्यवसायात पदार्पण, स्वानंदीने लाँच केला स्वतःचा ब्रँड, नावही आहे खास

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 22, 2025 | 4:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
lakshmikant berde daughter swanandi berde New Business

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लेकीचं व्यवसायात पदार्पण, स्वानंदीने लाँच केला स्वतःचा ब्रँड, नावही आहे खास

lakshmikant berde daughter swanandi berde New Business : मराठी सिनेविश्वात अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी अभिनयाबरोबरच जोडधंदा म्हणून व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अभिनय ही त्यांची आवड असली तरी याला काहीतरी जोडधंदा हवा म्हणून अनेक कलाकारांनी व्यवसाय क्षेत्राची निवड केली आहे. यांत काहींनी स्वतःचे रेस्टॉरंट, दागिन्यांचा व्यवसाय, साड्यांचा व्यवसाय अशा अनेक व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. अभिनयाबरोबर त्यांनी व्यवसाय क्षेत्रातही नाव कमावलेलं पाहायला मिळतंय. अभिनेत्री मृणाल दुसानिस, तेजस्विनी पंडित, रेश्मा शिंदे, अक्षया देवधर, प्राजक्ता माळी या अभिनेत्रींनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ऋतुजा बागवेने तिच्या नव्या हॉटेलचं उदघाटन केलं.

यापाठोपाठ आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने म्हणजेच स्वानंदी बेर्डेने स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. स्वानंदी ही ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची लेक आहे. आई वडिलांच्या पाठोपाठ स्वानंदीने अभिनय क्षेत्राची निवड करत अभिनयक्षेत्रात पाऊल टाकलं. अभिनयाबरोबरच स्वानंदी आता व्यवसाय क्षेत्रात उतरली आहे. आणि या आनंदाच्या बातमीबाबत तिने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. स्वानंदीने स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरु केला आहे.

आणखी वाचा – दारू प्यायले, रक्ताच्या उलट्या झाल्या आणि…; दोन वर्षांची असताना भारती सिंगच्या वडिलांचे झालेले निधन, अभिनेत्रीला त्यांची एकही आठवण ठेवायची नाही कारण…

View this post on Instagram

A post shared by Swanandi L Berde (@swanandiberde)

स्वानंदीच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव कांतप्रिया असे आहे. हे नाव खास आहे कारण तिचे वडील लक्ष्मीकांत यांच्या नावातील कांत आणि आई प्रियाचे नाव एकत्र करुन तिने तिच्या ब्रँडचे नाव कांतप्रिया असे ठेवले आहे. कांतप्रिया या तिच्या नव्या ब्रँडची झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टखालील कॅप्शनमध्ये स्वानंदीने असं म्हटलं आहे की, “आज मी माझ्या एका अशा स्वप्नाची पाऊलवाट चालत आहे, जे प्रेमाने, आठवणींनी आणि मनापासून जपलं गेलं. ‘कांतप्रिया’ हा माझ्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर माझ्या हृदयाचाच एक भाग आहे. कारण त्याचं नाव माझ्या वडिलांच्या लक्ष्मीकांत (कांत) आणि आईच्या प्रिया (प्रिया) नावांपासून बनलं आहे. हे दोघं माझं आयुष्य आहेत”.

आणखी वाचा – बायकोच्या संपत्तीचा, लोकप्रियतेचा फायदा घेतोय?, गंभीर आरोपांनंतर हिना खानच्या नवऱ्याचे स्पष्टीकरण, म्हणाला, “मी जितके कमावतो त्याहून…”

यापुढे ती म्हणते, “दागिन्यांच्या व्यवसायातील माझा हा प्रवास म्हणजे, माझ्या आईवडिलांचं प्रेम आणि त्यांचा वारसा जपण्यासाठी निवडलेला एक मार्ग आहे. भारतीय परंपरा आणि आधुनिकतेचं एक सुंदर मिश्रण, विशेषतः लग्न, सण- उत्सव आणि रोजच्या खास क्षणांसाठी ‘कांतप्रिया’ आहे. दागिन्यांच्या या नव्या प्रवासात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते”.

Tags: lakshmikant berdenew businessswanandi berde
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Akshay Kumar Fitness Secret

सोमवारी उपवास, रोज सहाच्या आधी जेवण आणि…; अक्षय कुमारचं फिटनेस सिक्रेट, म्हणाला, "फक्त आपले पोट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.