बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडलं, रक्ताच्या धारा वाहिल्या आणि…; ‘देवमाणूस ३’मध्ये ‘असा’ शूट झाला सीन, bts video समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 22, 2025 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Devmanus final scene

अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडलं, रक्ताच्या धारा वाहिल्या आणि…; 'देवमाणूस ३'मध्ये 'असा' शूट झाला सीन, bts video समोर

Devmanus final scene : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘देवमाणूस ३’ मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. रहस्य, थरार अशी धाटणी असणारी ही मालिका लोकप्रिय ठरली. या मालिकेचा तिसरा सीझन सध्या सुरु आहे. या मालिकेची सध्या मालिकाविश्वात हवा असलेली पाहायला मिळत आहे. सुरुवातीला मालिकेचा ट्रॅक काही प्रेक्षकांना पसंतीस आला नाही मात्र मालिकेच्या कलाकारांवर आणि सीन्सवर प्रेक्षक भाळले. देवमाणूस म्हणजेच अजित कुमार देव, देवीसिंग आणि गोपाळ हा प्रत्येक वेळी खून करुन सहज कसा सुटतो, यात काही तरी नवीन हवं, असं प्रेक्षकांनी म्हटलं. आणि त्यानंतर हळूहळू मालिकेच्या कथेमध्ये ट्विस्ट येत गेला. अशातच काही दिवसांपूर्वी मालिकेतील गंगा या पात्राची एक्झिट झाल्याचं पाहायला मिळालं.

गंगाच्या एक्झिटच्या सीनवेळी खोटा गोपाळ तिला संपवतो. एक ट्रॅक्टर त्या गंगाच्या अंगावरुन घालून तिला तो चिरडून टाकतो. त्यानंतर गंगा आणि तिच्या आजू-बाजूला रक्ताच्या धारा लागलेल्या पाहायला मिळतात, मालिकेतील हा सीन पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. हा सीन करताना पोटात गोळा आला होता, दडपण आलेलं असं गंगा म्हणजेच अभिनेत्री एकता डांगरने पोस्टद्वारे म्हटलं. तर गोपाळनेही हा सीन शूट करताना सलग तीन दिवस रात्रीचे आणि भरपावसात शूटिंग केले.

आणखी वाचा – “मजामस्करीत असं म्हटलं…”, वरण-भात गरिबांचं जेवण म्हणताच ट्रोल झालेल्या विवेक अग्निहोत्रीचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कोणत्याच वादात…”

View this post on Instagram

A post shared by Ekta Dangar (@ektadangar)

गोपाळ म्हणेजच अभिनेता किरण गायकवाडनेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या भयानक सीनदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. एकताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती गंगा म्हणून शेवटचा संवाद साधताना दिसते. यावेळी ती गोपाळचा उल्लेख करत म्हणते, “तो ट्रॅक्टर पुन्हा रिव्हर्स घेतो आणि ट्रॅक्टर तिच्यावरुन नेऊन तिला चिरडतो. ती आता त्याच्यासमोर रक्ताची उलटी करते. तिच्यामध्ये अजूनही जीव आहे आणि तिच्यासमोर तिला गोपाळ दिसतो. त्याच्याबरोबरचं संसाराचं स्वप्न, त्याच्याबरोबर पळून जाण्यासाठी केलेले प्रयत्न तिला आठवतात. तिचा जीव अजूनही गेलेला नाही. तो तिच्यावरून ट्रॅक्टर नेतो आणि मग गंगा जीव सोडते”.

आणखी वाचा – “नोरा फतेहीसारखी फिगर हवी”, नवऱ्याच्या मागणीने पत्नी त्रस्त, दिवस-रात्र जिमला पाठवायचा, उपाशी ठेवायचा आणि…

एकता व्हिडीओच्या शेवटी म्हणते, “मला अभिमान आहे. गंगा मालिकेत जरी तुझा शेवट होत असला तरी प्रेक्षकांच्या मनात तू कायम असशील”.एकता डांगर हिनं गेले अनेक दिवस या मालिकेत गंगाचं पात्र साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली. आता तिच्या पात्राचा शेवट होणार असल्याचं पाहायला मिळतं आहे. यानंतर आता मालिकेत अजून काय घडणार हे येणाऱ्या भागातच समजेल.

Tags: Devmanus final scenedevmanus serialmarathi malika
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
man misbehaved with priya bapat

"त्याने माझ्या स्तनांना पकडलं आणि…", दादरसारख्या शहरात अभिनेत्रीसह घडलेली वाईट घटना, म्हणालेली, "तीन सेकंड मला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.