शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मालिकांमधील सगळ्यात मोठा विवाहसोहळा, ‘रमा-राघव’चा शाही थाट, तर मंगळसूत्राच्या डिझाइनमध्ये कोरलं नवऱ्याचं नाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 15, 2024 | 2:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rama Raghav Wedding

मालिकांमधील सगळ्यात मोठा विवाहसोहळा, 'रमा-राघव'चा शाही थाट, तर मंगळसूत्राच्या डिझाइनमध्ये कोरलं नवऱ्याचं नाव

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडतात. या मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असलेल्या पाहायला मिळतात. अशातच या वाहिनीवरील एका मालिकेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ही मालिका म्हणजे ‘रमा राघव’. ‘रमा राघव’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या मालिकेत आलेले ट्विस्ट रसिक प्रेक्षकांची मन जिंकत आहेत. सध्या या मालिकेत लग्नाचे सीन पाहायला मिळत आहेत. रमा-राघव यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. (Rama Raghav Wedding)

रमा-राघव यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मेहंदी, संगीत, हळद या कार्यक्रमांचे चित्रीकरण मालिकेत झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. तर रमा-राघव यांच्या लग्नाचाही एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘रमा-राघव’चे लग्न लवकरात लवकर व्हावे ही तमाम प्रेक्षकांची इच्छा होती, अखेर प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. गेले कित्येक दिवस प्रेक्षक वर्ग रमा राघव यांचं लग्न व्हावे अशी आशा व्यक्त करत होते.

आणखी वाचा – “आई कुठे…”, मालिकेमधून आशुतोष केळकरची एक्झिट दाखवताच मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, म्हणाले, “तो नसणार याचा मला…”

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

अखेर वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीत मालिकेत रमा-राघव यांचा लग्न लागतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील रमा-राघव यांच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विधिवत होणाऱ्या या लग्नात नववधूवरांचा पेशवाई लूक खूपच खास असल्याचं दिसत आहे. पारंपरिक पोशाख, दागिने यांनी सजलेल्या या सोहळ्यात रमाचे ‘रमा-राघव’ असे नाव असलेले मंगळसूत्र हे त्याच्या या वेगळेपणामुळे चर्चेत आले आहे.

आणखी वाचा – Video : आलिया भट्टच्या बर्थडे पार्टीमध्ये तिच्या सासूबाईंचीच हवा, अंबानी कुटुंबियांचीही उपस्थिती, मात्र लेक राहाला सोडून सेलिब्रेशन अन्…

रमाचा या मालिकेतील मराठमोळा लूक साऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. पुरोहित व परांजपे कुटुंबात सध्या आनंदच वातावरण पाहायला मिळत आहे. रमा-राघव यांचा लग्नसोहळा ज्या जल्लोषात पार पडला असून दोघांच्या आयुष्यातील नवी सुरुवात मालिकेत पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे.

Tags: marathi serialrama raghavrama raghav lookRama Raghav Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Samir choughule Fan Moment

समीर चौघुलेंच्या चाहत्याने केलेलं 'ते' कृत्य पाहून अभिनेताही भारावला, फोटोही केला शेअर, म्हणाले, "अशा वेळी काय बोलावं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.