गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आलिया भट्टच्या बर्थडे पार्टीमध्ये तिच्या सासूबाईंचीच हवा, अंबानी कुटुंबियांचीही उपस्थिती, मात्र लेक राहाला सोडून सेलिब्रेशन अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 15, 2024 | 12:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Alia Bhatt Birthday Party

Video : आलिया भट्टच्या बर्थडे पार्टीमध्ये तिच्या सासूबाईंचीच हवा, अंबानी कुटुंबियांचीही उपस्थिती, मात्र लेक राहाला सोडून सेलिब्रेशन अन्…

बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक म्हणजे आलिया भट्ट. आलियाने आजवर तिच्या अभिनयाने व सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आलिया भट्टचा १५ मार्च रोजी वाढदिवस झाला. आलिया ३१ वर्षांची झाली आहे. यानिमित्त प्रत्येकजण अभिनेत्रींवर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. आलियाने वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तिच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. आलियाच्या बर्थडे पार्टीतील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (Alia Bhatt Birthday Party)

आलिया भट्टने तिचा ३१वा वाढदिवस कुटुंबाबरोबर व तिच्या मित्र परिवाराबरोबर साजरा केला. आलियाच्या वाढदिवसाला इशा अंबानी व आकाश अंबानीही सहभागी झाले होते. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आलिया पती रणबीर कपूर, सासू नीतू कपूर, बहीण शाहीन भट्ट, आई सोनी राजदान व इशा अंबानी-आकाश अंबानी यांच्यासह एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसली.

आणखी वाचा – “आपणच आपले पाय ओढतो” मराठी मनोरंजनसृष्टीबाबत गश्मीर महाजनीचं मोठं विधान, म्हणाला, “हा पॅटर्न मोडीत…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या वाढदिवसाच्या पार्टीत आलिया आणि तिचे संपूर्ण कुटुंब दिसले, पण तिची लाडकी लेक राहा दिसली नाही. राहा अनेकदा तिच्या आई-वडिलांसह दिसत असते. याआधी राहा अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये दिसली होती, जिथे प्रत्येकजण तिच्या क्युटनेसच्या प्रेमात पडले. तर नीतू कपूरने सूनेच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. यावेळी सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. अगदी हटके स्टाइलमध्ये नीतू कपूर यांनी लावलेल्या हजेरीने या पार्टीत हवा केली. हसत हसत त्या पापाराजीसाठी पोज पोज देताना दिसल्या.

आणखी वाचा – “आई कुठे…”, मालिकेमधून आशुतोष केळकरची एक्झिट दाखवताच मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, म्हणाले, “तो नसणार याचा मला…”

आलियाच्या वाढदिवसाच्या पार्टीत ईशा व आकाश अंबानीही हजर होते. दोघेही रणबीर व आलियाचे खूप जवळचे मित्र आहेत. एवढेच नाही तर ईशा अंबानी ही आलियाची बिझनेस पार्टनर आहे. आलियाच्या लूकबद्दल बोलायचे तर, यावेळी बर्थडे गर्ल आलियाने ब्लू डेनिमसह ट्यूब टॉप परिधान केला होता. कमीत कमी मेकअप आणि मोकळ्या केसांत आलिया नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. तर ब्लॅक लूकमध्ये रणबीर कपूरही खूपच उठून दिसत होता. समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये आलिया व रणबीर त्यांच्या पाहुण्यांना भेटतानाही दिसले.

Tags: alia bhattalia bhatt with ranbir kapoorAlia Kapoor Birthday Partyentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Milind Gawli and Rupali Bhosle expressed their reaction on the trolling of the aai kuthe kay karte serial

“प्रेक्षकांनी विरोध केला तरी...”, ‘आई कुठे...’च्या ट्रोलिंगवर अनिरुद्ध-संजनाचं स्पष्ट मत, म्हणाले, “आम्ही चुका केल्या पण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.