कलर्स मराठीची लोकप्रिय मालिका ‘अबीर गुलाल’ आता अवघ्या काही दिवसांत संपणार आहे. मालिकेच्या शेवटच्या दिवसांचे शूटिंग सुरू आहे. ही मालिका २७ मे रोजी म्हणजेच, अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. मालिकेच्या मुख्य भूमिकांमध्ये अभिनेता अक्षय केळकर, अभिनेत्री पायल जाधव आणि गायत्री दातार हे कलाकार आहेत. या मालिकेतील श्री, अगस्त्य आणि शुभ्रा ही पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. कमी टीआरपीमुळे आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याविषयी अक्षयने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर केली होती. अशातच आता मालिकेची बंद होण्यावर अभिनेत्री पायल जाधवने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Payal Jadhav Emotional)
‘इट्स मज्जा’ला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने मालिकेच्या निरोपाबद्दल असं म्हटलं की, “मालिकेसाठी मी प्रेक्षकांचे आभार मानेन. त्यांनी खूप पटकन मला आपलंसं केलं. त्यामुळे माझ्यातला आत्मविश्वास वाढला. प्रेक्षकांनाही आता अंदाज आहे की, मराठी चित्रपट, मालिका आणि चॅनेल्स या सर्वांचंच आताच वातावरण बिघडलेलं आहे. म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. कारण पैशांची तशी चलबिचल होत नाही. अशा काळात मला मुख्य अभिनेत्री म्हणून संधी मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती”.
आणखी वाचा – अंध चाहतीने गायलं गाणं, उत्कर्ष शिंदेने शेअर केली डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला, “माइकला हात लावताच…”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “यासाठी मी कलर्स मराठीचेही कायम आभार मानेन. ज्यांनी ज्यांनी संधी दिली त्या सर्वांना धन्यवाद आणि प्रेक्षकांनाही खूप खूप धन्यवाद आणि हा शेवट नाही तर सुरुवात आहे. अर्थात वाईट वाटत आहे, कारण आमचं एक गणित जुळलं होतं. पण या मालिकेशिवायही प्रेक्षकांनी आमच्यावर असंच प्रेम करत रहावं”. यावेळी बोलताना अभिनेत्री काहीशी भावुक झाल्याचेही पाहायला मिळाले.
दरम्यान, पायलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘बापल्योक’ चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. या चित्रपटातीळ टिकच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली. त्यानंतर ती ‘अबीर गुलाल’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. तिने नुकतंच ‘मानवत मर्डर्स’ या सीरिजमध्येही काम केलं आहे. याशिवाय पायल एक भरतनाट्यम नृत्यांगणादेखील आहे. पुण्याच्या ललित केंद्रातून तिने भरतनाट्यममध्ये पदवी मिळवली आहे.