गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : वाहती नदी अन् गावचं जेवण…, शूटिंगमधून वेळ काढत प्रसिद्ध अभिनेता पोहोचला कोकणात, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, “मन आणि शरीर…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 26, 2023 | 10:23 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Santosh Juvekar enjoys vacation in Kokan

संतोष जुवेकर कोकणात, व्हिडिओ व्हायरल

सध्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक जण आपल्या मूळगावी गेले. मराठी अभिनय विश्वातील अनेक कलाकारांची मूळ गाव कोकणात आहे. त्यामुळे कलाकार मंडळी त्यांच्या शूटिंगमधून वेळ काढत कोकणच्या दिशेने जातात. हिरवागार निसर्ग, खळखळ वाहणाऱ्या नद्या, तिथली संस्कृती यांमुळे प्रत्येकाला कोकणचं वेगळं आकर्षण असतं. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नुकताच त्याच्या मूळ गावी पोहोचला. त्याने शेअर केलेला व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. (Santosh Juvekar enjoys vacation in Kokan)

अनेक मालिका व चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता संतोष जुवेकर त्याच्या चित्रपटातील शूटिंगमधून वेळ काढत त्याच्या मूळगावी कोकणात गेला. याचा व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो गावात फिरताना, मित्रांसह नदीत पोहोताना दिसत आहे. त्याचबरोबर त्याने खास गावच्या जेवणाचा आनंददेखील घेतला.

हा व्हिडिओ शेअर करताना संतोषने असं कॅप्शन दिलं की, “कोकण माझं, गाव माझं. खूप काही चोकअप झालं होतं. माझ्या कोकणाचा दट्ट्या दिला आणि सगळं एकदम मोकळ मोकळ झालं, आता नव्याने भरभरून वहायला मी मोकळा झालो. पावसात भिजलो, रानात हिंडलो, नदीत पोहोलो आणि चुलीवरचा भात आणि माश्याचं सार अन् तुकडी असं अस्सल मेडिटेशन करून आलो. आता मन आणि शरीर दोन्हीही हलकं झालंय एकदम”

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

हे देखील वाचा – बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला कन्यारत्न प्राप्त, इन्स्टाग्रामवर लेकीबरोबरचे फोटो शेअर करत केला तिच्या नावाचा खुलासा

संतोषचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना भावला असून कमेंट्सद्वारे ते आपल्या भावना व्यक्त करत आहे. एक नेटकरी यावर म्हणाला, “मनाचा तळ स्वछ करायला निसर्गा शिवाय पर्याय नाही हेच खरं”. तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, “गावात जी मज्जा आहे, ती मोठमोठ्या इमारतींच्या शहरात कुठे आहे”

हे देखील वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर प्रभाकर मोरे आणि गायिका मोनल कडलकने धरला ‘या’ गाण्यावर ठेका, व्हिडिओ व्हायरल

अभिनेता संतोष जुवेकर आपल्याला अनेक मालिका व चित्रपटांमध्ये दिसलेला आहे. ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘रेगे’ या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. त्याचबरोबर, काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘डेट भेट’ चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाला होता. सध्या तो एका हिंदी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून त्याचा एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याला मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुरलेले आहे.

Tags: marathi actorsantosh juvekarSantosh Juvekar enjoys vacation in Kokan
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Rahul disha daughter grand welcome

Video: ‘लक्ष्मी आली घरी’ म्हणत राहुल वैद्यच्या आई-बाबांनी केलं नातीचं स्वागत, म्हणाला, “यापेक्षा जास्त…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.