बेपन्ना’, ‘सीआयडी’, ‘तेरे इश्क में घायाल’ यांसारख्या टेलिव्हिजनवरील कार्यक्रमाचा भाग असलेली टीव्ही अभिनेत्री वैष्णवी धनराजबाबत एक मोठी बातमी समोर आली. अभिनेत्रीच्या कुटुंबाने तिचे शारीरिक शोषण केले असल्याचे समोर आले. ट्विटर अकाऊंटवरून तिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री मदतीची मागणी करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री तिच्या जखमा दाखवत आहे. तसेच तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला मारहाण केल्याचं सांगत मदतीसाठी तिने हाक मारली आहे. (Cid Fame Vaishnavi Dhanraj Video)
हिमांशू शुक्ला नावाच्या ट्विटर अकाउंटवरून वैष्णवी धनराजने व्हिडीओ शेअर केला आहे. ‘सीआयडी’ फेम अभिनेत्रीने मदतीची मागणी केली आहे. सध्या ती मुंबईतील काशिमीरा पोलीस ठाण्यात आहे. हिमांशू नावाच्या अकाउंटवर वैष्णवीबद्दल अनेक पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. दरम्यान वैष्णवीच्या कुटुंबियांनी तिचा फोन काढून घेतला असल्यामुळे ती हिमांशू शुक्ला या अकाउंटवरून मदत मागत असल्याचं या व्हिडीओसह तिने सांगितलं आहे.
She is #VaishnaviDhanraj, who did TV shows like #CID, #Madhubala, #Bepannaah etc.
— K Himaanshu Shuklaa (@khimaanshu) December 15, 2023
Right now she is in #KashimiraPolice station. And she needs help from the media.
I don't have words to express my gratitude to #MumbaiPolice. You guys are loving, helpful and amazing. Love you❤️ pic.twitter.com/qVTFL0318a
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वैष्णवी तिला केलेल्या मारहाणीबद्दल भाष्य करताना दिसत आहे. या व्हिडीओद्वारे तिने मदत करण्याची विनंती केलेली पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमधून वैष्णवीने तिच्या चेहरा, ओठ, हातांवरील जखमेच्या खुणा दाखवल्या आहेत. तसेच सदर व्हिडीओ पोलीस स्टेशनमध्ये शूट केल्याचंही तिने सांगितलं आहे.
अभिनेत्रीच्या या पोस्टवर मुंबई पोलिसांनीही प्रतिक्रिया देत तिचा नंबर मागितला आहे. जेणेकरून ते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू शकतील. वैष्णवी धनराजने २०१२ मध्ये नितीन शेरावतशी लग्न केलं होतं. मात्र, आता त्यांचा घटस्फोट झाला आहे. दरम्यान लग्नानंतर अभिनेत्री तिच्या माहेरी राहत होती.