बॉलिवूड सिनेसृष्टीतील बच्चन कुटुंब सध्या विशेष चर्चेत आलं आहे. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या बच्चन वेगळे होत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यांत बिग बी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या बच्चनला अनफॉलो केल्याने या चर्चा अधिकच उठावदार झाल्या होत्या. ‘झूम’च्या वृत्तानुसार, ऐश्वर्या वेगळी राहत असल्याचं समोर आलं आहे. बच्चन कुटुंबियांच्या ‘जलसा’मधून ती बाहेर पडली असल्याचं समोर आलं. असं असलं तरी अभिषेक बच्चन व ऐश्वर्या हे घटस्फोट घेणार नसल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. (Aishwarya Rai Bachchan And Abhishek Bachchan Video)
घटस्फोट व विभक्त होण्याच्या अनेक आरोपांच्या दरम्यान बॉलिवूडमधील हे लोकप्रिय कपल ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन एकत्र दिसले. मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक उत्सवात त्यांनी एकत्र हजेरी लावली असल्याचं पाहायला मिळालं. तसेच अगस्त्य नंदाच्या ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या प्रीमियरला बच्चन कुटुंबाने हजेरी लावल्यापासून अभिषेक व ऐश्वर्या यांच्या वैयक्तिक जीवनात बरीच कुजबुज सुरू झाली.
या अफवांना आणखी पसरत गेल्या कारण अभिनेत्री तिच्या सासरच्या घरातून बाहेर पडली असल्याचं समोर आलं. ऐश्वर्या व तिची आई वृंद्या राय एका वाहनातून या सोहळ्यासाठी पोहोचल्या होत्या. लोकेशनवर अभिषेक बच्चन, अगस्त्य नंदा व अभिनेते अमिताभ बच्चनही त्याचवेळी पोहोचले. दरम्यान अमिताभ बच्चन व वृंद्या एकमेकांसमोर येताच त्यांनी एकमेकांसह संवाद साधलेला पाहायला मिळाला. शाळेत प्रवेश करताना अभिषेक ऐश्वर्याशी बोलताना दिसला.
ऐश्वर्या राय व अभिषेकचा धीरूभाई अंबानी शाळेतील वार्षिक कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांनतर घरी परतताना अभिषेक व ऐश्वर्या एकत्र एकाच गाडीने जाताना दिसले. काल रात्री या दोघांनी मुंबईतील या कार्यक्रमात एकत्र हजेरी लावल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला.