मराठी चित्रपटांमधील स्पर्धा टळावी म्हणून ‘चौक’ चित्रपटाने बदलली प्रदर्शनाची तारीख

Chowk Movie Big Announcement
Chowk Movie Big Announcement

हल्ली चित्रपटांच्या रांगाच लागल्या आहेत. एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. आणि प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटांचं प्रमोशनही जोरदार सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार ‘चौक’ या चित्रपटाने एक विधायक पाऊल उचललं आहे. एप्रिल-मे मध्ये शाळांना सुट्या असल्याने अनेक मराठी चित्रपट या महिन्यांत प्रदर्शित होतात.(Chowk Movie Big Announcement)

त्यात ५ मे ला प्रदर्शित होणारा ‘बलोच’ आणि १२ मे ला प्रदर्शित होणारा ‘रावरंभा’ या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळावा आणि मराठी चित्रपटांची आपापसात स्पर्धा होऊ नये यासाठी बहुचर्चित ‘चौक’ या चित्रपटाने एक कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. चौक चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची १२ मे ही तारीख एक आठवडा पुढे घेतली आहे. आता हा चित्रपट १९ मे रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज होत आहे.

चौक चित्रपटाने उचललं मोठं पाऊल (Chowk Movie Big Announcement)

मराठी चित्रपटांमधील स्पर्धा टळावी यासाठी या चित्रपटाने घेतलेला निर्णय अर्थात वाखाणण्याजोगा आहे. चौक चित्रपटाने प्रदर्शनाची तारीख पुढे घेत घेतलेला हा निर्णय मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम आदर्श ठरला आहे. सर्व मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग मिळावा यासाठी उचललं हे विधायक पाऊल आहे. दिग्दर्शक देवेंद्र अरुण गायकवाड, निर्माते दिलीप लालासाहेब पाटील आणि ‘चौक’च्या सर्व टीमने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.(Chowk Movie Big Announcement)

यावेळी बोलताना दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड म्हणाले की, ‘आमच्याच मित्रांचे ‘बलोच’ आणि ‘रावरंभा’ हे चित्रपट मे मध्ये प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी ‘चौक’ चित्रपटाची १२ मे ही तारीख बदलून आता १९ मे करण्यात आली आहे. त्यामुळे १९ मे रोजी हा चित्रपट सर्वांनी चित्रपटगृहात जाऊनच बघा!’

हे देखील वाचा – तांजानियाच्या किली पॉलला ही पडलीय ‘बहरला मधुमास’ची भुरळ

तर प्रविण तरडे म्हणाले की, ‘इतर चित्रपटांचा विचार करून, आमचा मित्र दया याने त्याचा ‘चौक’ हा चित्रपट एक आठवडा पुढे घेत एक अभिमानास्पद पाऊल उचललं आहे. त्याबद्दल त्याचं अभिनंदन!’(Chowk Movie Big Announcement)

‘चौक’ हा चित्रपट दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित असून अभिनेते प्रविण तरडे, रमेश परदेशी, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, संस्कृती बालगुडे या कलाकारांची मांदियाळी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता चौक हा चित्रपट १९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
The Kerala Story Controversy
Read More

१० सीन्स हटवले, ३२००० महिलांचं धर्मांतर?- वाचा नक्की काय आहे ‘द केरला स्टोरी’ कॉंट्रोव्हर्सी

द केरला स्टोरी हा चित्रपट ५ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.काही दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.…
Deepa Chaudhari
Read More

“बायको म्हणून नाही तर त्याची…”,चित्रपट पाहून भारावली दीपा

सध्या सर्वत्र महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट सुरु होण्याआधी या चित्रपटातील गाण्यांची भुरळ प्रेक्षकांना…
Lalit Prabhakar and Rinku Rajguru
Read More

ललितची मिस्ट्री गर्ल आली समोर, रिंकू आणि ललितचा रोमँटिक अंदाज

आज एखाद्या कलाकाराने सोशल मीडियावर पोस्ट केली की ती पोस्ट अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरते. दोन दिवसांपासून अभिनेता ललित…
TDM Marathi Movie Controversy
Read More

मराठी चित्रपटाची कथा, दिगदर्शकाचं प्रेक्षकांपुढे रडून व्यक्त होणं आणि थिएटर मालकाची मक्तेदारी!भाऊराव कऱ्हाडे याचं भावनिक आव्हान

मराठी चित्रपटाला शो न मिळणं या ही शोकांतिका आजची न्हवे. अनेक चांगले चित्रपट, कथा, गुणी कलाकार यांच्या कष्टाचं…
nivedita saraf pet
Read More

सराफ कुटुंबातील ‘सनी’चा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक व्यक्ती किंवा एकदा प्राणी हा जवळचा असतोच. आज जवळपास प्रत्येक जण हा प्राणी प्रेमी…
Kedar Shindes Emotional Post
Read More

शाहीर साबळेंच्या दुसऱ्या पत्नी भावुक, केदार शिंदेंची पोस्ट लक्षवेधी

‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. नातवाने आपल्या आजोबांच्या जीवनपटावर भाष्य करणाऱ्या या कलाकृतीला…