रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जत्रा, देवीची पालखी आणि…; गावी कोकणात पोहोचल्या छाया कदम व्हिडीओ पाहताच साधेपणाचं कौतुक

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 20, 2025 | 5:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Chhaya Kadam Video

जत्रा, देवीची पालखी आणि...; गावी कोकणात पोहोचल्या छाया कदम व्हिडीओ पाहताच साधेपणाचं कौतुक

Chhaya Kadam Video : मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री छाया कदम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘सरला एक कोटी’, ‘झुंड’, ‘लापता लेडीज’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्यानंतर छाया कदम आज प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. व्यस्त शूटिंग शेड्यूल आणि सततच्या प्रवासातून काहीसा ब्रेक घेत छाया नुकतीच आपल्या कोकणातील ‘धामापूर’ या मूळ गावी पोहोचली आहे. यावेळी तिने गावातील सरंबळच्या सातेरी देवीच्या जत्रेचे खास क्षण आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

छायाने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमधून कोकणातील जत्रेची पारंपरिक झलक स्पष्ट दिसत आहे. देवीची पालखी, ढोल–ताशा, गावकऱ्यांचा उत्साह आणि विशेषत: मामा मोचेमाडकरांचा दशावतार या लोककलेचे हे सर्व दृश्य तिच्या पोस्टमध्ये पाहायला मिळालं. अनेक वर्षांची परंपरा जपणारी ही जत्रा, गावकऱ्यांसाठी फक्त धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आनंदाचा एक मोठा सोहळा असतो.

आणखी वाचा – ८९ वर्षीय धर्मेंद्र यांची तब्येत आता कशी?, डिस्चार्ज झाल्यानंतर आठ दिवस सुरु आहेत घरीच उपचार, तब्येतीबाबत अपडेट समोर

View this post on Instagram

A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)

मोठी सेलिब्रिटी असूनही छाया सामान्य गावकरीप्रमाणे जत्रेत सहभागी होताना दिसून आली. यामुळे अनेक चाहत्यांकडून तिचं विशेष कौतुक केलं जात आहे. जत्रेतील उत्साह, गावातलं साधेपण आणि आपल्या गावाला पुन्हा भेटण्याचा आनंद छायाने सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केला आहे. तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “सरंबळची सातेरी जत्रा, देवीची पालखी, मामा मोचेमाडकरांचा दशावतार, गाव आणि मी!” असं लिहित तिने भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव देखील केला.

आणखी वाचा – मॉड्युलर किचन, आकर्षक इंटेरियर अन्…; आतून असं आहे सूरज चव्हाणचं घर, पाहा Inside Video

छाया कदमच्या करिअरबद्दल बोलायचं झालं, तर तिने अनेक दमदार भूमिका साकारत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तिने तिच्या अभिनयाची एक वेगळीच छाप उमटवली आहे. तिच्या दमदार अभिनयशैलीमुळे ती सदैव चर्चेत राहतेच, पण यावेळी तिच्या गावाकडच्या पोस्टने प्रेक्षकांचं विशेष मन जिंकलं आहे.

Tags: chhaya kadamentertainmentmarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Gargi Phule Facebook Post

प्रॉडक्शन हाऊसच्या उद्धट वागणुकीवर गार्गी फुले भडकल्या, म्हणाल्या, "माजखोरपणा करून लायकी दाखवणार असाल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.