आजकाल अभिनेत्री प्रसिद्ध होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतच असतात. आता उर्फी जावेदलाच घ्याना, उर्फी विविध गोष्टी वापरून तिचा लुक तयार करत असते. तिच्या फोटोंची चर्चा तर जगभर पसरलेली आहे. याचप्रमाणे मराठी अभिनेत्री देखील नवीन काही तरी करू पाहण्याच्या प्रयत्नात असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील विनोदी अभिनेत्री चेतना भट हिने नुकताच तिचा एका नव्या लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Chetana Bhat New Look)
या व्हिडिओच्या लूकमध्ये चेतना एखाद्या जुन्या हिरोइन प्रमाणे तयार झाली आहे. चेतनाने छान साडी नेसली आहे आणि त्यावर तिने केसात २ फुले माळली आहेत. या व्हिडीओला चेतनाने “Pari hu me Thank you Shiva for editing this ” असे कॅप्शन दिले आहे. कॅप्शन मध्ये या व्हिडिओला एडिट केल्या बद्दल तिने तिची सहकलाकार शिवाली परब हिचे आभार मानले आहेत. चेतनाच्या या व्हिडिओला एका चाहत्याने “आमची अवीटरागिनी” अशी कमेंट केली आहे.

हे देखील वाचा: ‘शरीरप्रदर्शन करायची माझी….’म्हणून अलका कुबल यांनी नाकारले हिंदी चित्रपट
चेतना भट हीच बालपण कल्याण शहरात गेलं. चेतनाने तीच महाविद्यालयातील शिक्षण वझे केळकर मुलुंड येथे पूर्ण केलं. कॉलेजपासून चेतनाने अभिनय करायला सुरुवात केली. चेतनाने लहानपणापासून चेतनाने भरत नाट्यमचे धडे गिरवले. आणि या सगळ्या मध्ये चेतनाला तिच्या आईने खूप साथ दिली. प्रोफेशन म्हणून चेतनाने डान्स पासून सुरुवात केली. एका नाटकात चेतनाने मैत्रिणीची रिप्लेसमेंट म्हणून एका नाटकात संजय नार्वेकरांसोबत काम केलं आहे. आणि तो प्रयोग देखील छान झाला. तिथून पुढे चेतनाने व्यावसायिक नाटकांना सुरुवात केली. (Chetana Bhat New Look)
हे देखील वाचा: पुन्हा एकदा रंगणार प्रवीण तरडे-पिट्या भाईची केमीस्ट्री बलोच मध्ये पिट्या भाई दिसणार ‘या’ भूमिकेत
एका पेक्षा एक सिझन ४ लिटिल चाम्स मध्ये सुद्धा चेतनाने टॉप ५ पर्यंत चा प्रवास तिच्या छोट्या जोडीदारणीसोबत केला होता. अशा प्रकारे चेतनाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. हास्यजत्रेबद्दल सांगायचं झालं तर त्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर असतात. कलाकारांना रोज काही तरी नवीन सादर करायचं असतं, अशातच हास्यजत्रेतील कलाकारांसोबतच लेखकांना देखील तेवढेच काम असते. या बद्दलची जाणीव सगळ्या कलाकारांना असते, असं चेतना सांगते.