पुन्हा एकदा रंगणार प्रवीण तरडे-पिट्या भाईची केमीस्ट्री बलोच मध्ये पिट्या भाई दिसणार ‘या’ भूमिकेत

Baloch Official Teaser
Baloch Official Teaser

मराठ्यांच्या अजरामर शौर्य गाथांमध्ये काही महत्वाच्या कथा अजूनही अनुत्तरित आहेत असाच काही शौर्यगाथानांवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी चित्रपट सृष्टी दिवसेंदिवस बहरताना आपल्याला दिसते. अनेक वेगवेगळ्या विषयांवर होणारी चित्रपटांची निर्मिती समाज प्रबोधन करण्याचं काम करत आहेत. अशातच मराठ्यांचा गौरववण इतिहास सांगण्यासाठी ‘ बलोच ‘ या चित्रपटाची निमिर्ती करण्यात आली. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Baloch Official Teaser)

गाजलेल्या युध्दांमधली एक लढाई आपण सगळ्यांनीच लहानपणा पासून ऐकली असेल ती म्हणजे ‘पानिपतची लढाई’. पानिपतच्या लढाईत मराठयांचा झालेला पराभव सुद्दा एक क्रांती होती असं म्हणणारा हा चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला आहे. या टिझर मध्ये प्रवीण तरडे आणि अशोक समर्थ हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसत असून सोबतच पिट्याभाई म्हणून प्रसिद्ध झालेला अभिनेता रमेश परदेशी सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.

हे देखील वाचा – म्हणून अशोक सराफ नानांना म्हणाले..’काय नान्या श्रीमंत झालास का?’

टिझर मध्ये पानिपतची लढाई ही मराठ्यांची शेवटची लढाई न्हवती असं सांगत पानिपत नंतर घडलेल्या महत्वाच्या घटनेवर आधारित हा चित्रपट निर्मित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पेशवाईतील सरदार सदाशिव भाऊ पेशवे यांची भूमिका अभिनेता रमेश परदेशी करणार असल्याच समोर आलं आहे.

पानिपतच्या लढाई नंतर बलुचिस्तान येथे मराठ्यांना गुलामी पत्करावी लागली. पानिपतची लढाई आणि पराभव ही मराठेशाहीसाठी जरी काळा दिवस असला तरी मराठी ही मराठ्यांच्या असीम शौर्याची गाथा आहे, जी ‘बलोच’च्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, ”बलोच ही एक सकारात्मक गोष्ट आहे. यापूर्वी आपण पानिपतबद्दल ऐकले आहे, ते केवळ पराभवाबद्दलच आहे. मात्र पानिपतच्या युद्धानंतर जेव्हा गुलामीच्या अवस्थेत असताना पुन्हा एकत्र येणे, संघर्ष करणे, ही गोष्ट प्रामुख्याने दाखवण्यात आली आहे. पानिपतचे युद्ध हे पराभव नसून शौर्य होते. हा चित्रपट पाहिल्यावर हा अभिमान प्रेक्षकांना जाणवेल आणि पानिपतकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी मला आशा आहे.’(Baloch Official Teaser)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Vanita Kharat talks obesity
Read More

‘मी जाड आहे पण..’ लठ्ठपणावर केलं वनिताने परखड भाष्य

परखड, बिनधास्त व्यक्तिमत्वांमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात. आपल्या मनाला वाटेल ते कायम करणं,…
Onkar Bhojane Ankita Walavalkar
Read More

अंकिता आणि ओंकारच्या हळदीची रंगली चर्चा

कलाकार मंडळींनी आपला क्रश सांगितला की, प्रेक्षक त्यांच्यात नातेसंबंध असल्याच्या चर्चा करतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेल्या ओंकार…
Hindustani Bhau Sameer Wankhede
Read More

हिंदुस्थानी भाऊचा समीर वानखेडेला पाठिंबा-जाणून घ्या काय म्हणाला हिंदुस्थानी भाऊ?

एनसीबी चे माजी संचालक समीर वानखेडे,अभिनेता शाह रुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेल्या अटकेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले
Jitendra Joshi Daughter Reva
Read More

“लेकीची १३ व्या महिन्यात पहिली ट्रिप ते १३ व्या वर्षी पहिली आंतरराष्ट्रीय ट्रिप” जितू आणि रेवाची लंडन वारी, शेअर केला खास व्हिडिओ

सगळ्या नात्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रेमळ नातं समजलं जात ते म्हणजे वडील आणि मुलीचं. सध्या परदेशवारीत बिझी आहे मराठी…