शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“फॉलोअर्स पाहून काम गेलं अन्…”, योगेश शिरसाट यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “चित्रीकरणाच्या दोन दिवसांपूर्वी…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 3, 2024 | 10:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Yogesh Shirsat said in Majjacha Adda program he was removed from an advertisement due to low followers

“फॉलोअर्स पाहून काम गेलं अन्...”, योगेश शिरसाट यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “चित्रीकरणाच्या दोन दिवसांपूर्वी...”

छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून नावारुपाला आलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे योगेश शिरसाट. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात त्याने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. योगेशने ‘चला हवा येऊ द्या’सह ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’सारख्या अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये विनोदी स्किट्सद्वारे मनोरंजन केले. अभिनयाशिवाय योगेशने लेखन करतही अनेक विनोदी स्किट्स केले आहेत. त्याचबरोबर रुपेरी पडद्यावरही त्याने साकारलेल्या भूमिकांचं कौतुक झालं.

लेखन, अभिनय करत मनोरंजन क्षेत्रात रमणारा हाअ अभिनेता राजकारणातही तितकांच सक्रिय आहे. अशातच योगेशने नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांना त्यांच्या “दिसण्यावरुन मनोरंजन सृष्टीत कधी कोणती भूमिका नाकारली गेली आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी “दिसण्यामुळे कधी एखादी भूमिका गेली नाही” असं म्हटलं. पण सोशल मीडियावरील कमी फॉलोवर्समुळे काम गेले असल्याचे त्याने सांगितले.

आणखी वाचा – तीन मुलं असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात, लोकांनी नको नको ते सुनावलं अन्…; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने का घेतला होता असा निर्णय?

यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “माझ्या दिसण्यावरुन किंवा शरीरयष्टीवरुन मला कामामध्ये काहीच अडचण आली नाही. उलट मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दिसण्यापेक्षा गुणवत्तेला अधिक महत्त्व दिलं जातं. मला तसा काही अनुभव आला नाही. पण सोशल मीडियावर फॉलोअर्समुळे कामं जातात हे मी अनुभवलं आहे.” यापुढे योगेशने कमी फॉलोअर्समुळे त्याला एका जाहिरातीतून काढून टाकण्यात आल्याविषयी त्यानी सांगितले.  

आणखी वाचा – ऐश्वर्या नारकर नव्हे तर ‘सातव्या मुलीची…’मध्ये रुपालीच्या भूमिकेसाठी अलका कुबल यांना घ्यायचं होतं पण…; दिग्दर्शक म्हणाले, “असा चेहरा…”

याबद्दल त्याने असं म्हटलं की, “एका जाहिरातीसाठी माझी निवड झाली. त्या जाहिरातीच्या चित्रीकरणासाठीही मी तयार झालो. विमानाची तिकिटंही माझ्याकडे आली. जयपूरला त्या जाहिरातीचं चित्रीकरण होतं. सगळं ठरलं होतं. मात्र, चित्रीकरणाच्या दोन दिवसांपूर्वीच त्या जाहिरातीच्या टीमने माझे इन्स्टाग्रामवरचे फॉलोअर्स पाहिले आणि माझे फॉलोअर्स पाहिल्यानंतर मला त्यांनी जाहिरातीमधून काढून टाकलं”.  

Tags: marathi actormarathi entertainment newsyogesh shirsat
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
today 04 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

श्रवण नक्षत्रातील सिद्ध योगामुळे 'सिंह' व 'तूळ' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होणार, इतर राशींच्या नशिबात नेमकं काय? जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.