शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कामाची दखल…”, विमानप्रवासादरम्यान इंडिगो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं कौतुक पाहून भारावला कुशल बद्रिके, म्हणाला, “कुठेतरी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 9, 2024 | 10:41 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kushal Badrike Fan Moment

"कामाची दखल…", विमानप्रवासादरम्यान इंडिगो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं कौतुक पाहून भारावला कुशल बद्रिके, म्हणाला, "कुठेतरी…"

कलाकारांच्या अभिनयाचे जगभरात लाखो चाहते दिवाने आहेत. ही कलाकार मंडळी त्यांच्या चाहत्यांचे नेहमीच भरभरुन मनोरंजन करत असतात. चाहत्यांच्या मनोरंजनात कुठेही ते कमतरता भासू देत नाहीत. तर चाहतेही या कलाकारांवर निखळ प्रेम करतात. झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. या कार्यक्रमाने नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन केलं असून आजवर त्यांच्या विनोदी स्क्रिप्टही पसंतीस पडल्या आहेत. गेली दहा वर्ष हा कार्यक्रम अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (Kushal Badrike Fan Moment)

या कार्यक्रमातील कलाकारांचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. या कार्यक्रमातून अभिनेता कुशल बद्रिके घराघरांत पोहोचला. कुशलला या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. कुशल गेली अनेक वर्ष या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात त्याने घर केलं आहे. सोशल मीडियावरही कुशल बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. अशातच कुशलने त्याची एक फॅन मुमेंट सोशल मीडियावरुन शेअर केली आहे.

आणखी वाचा – “सर तुम्ही आहात म्हणून…”, सचिन गोस्वामींच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुलेंची भावुक पोस्ट म्हणाले, “अफाट, अचाट आणि अद्वितीय..”

कुशलने विमान प्रवासादरम्यानची एक फॅन मुमेंट शेअर केली आहे. यांत विमानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कुशलला ग्रीटिंग कार्ड देत त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे आणि त्याच स्वागत केलं आहे. या ग्रीटिंग कार्डवर असं लिहिलं होत की, “आम्हाला तुमचा अभिनय व अभिनयकला मांडण्याची पद्धत नेहमीच आवडते”, असं म्हणत त्यांनी प्रेम व्यक्त केलं आहे. ही पोस्ट शेअर करत कुशलने, “आपल्या कामाची दखल कुठेतरी घेतली जात आहे”, असं म्हणत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा – अविनाश नारकरांचा तरुणांनाही लाजवणारा फिटनेस व्हिडीओ, रामदेवबाबांसारखा योगा अन…; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर कुशल हिंदी मालिकेकडे वळला आहे. सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाऐंगे’ या नव्या विनोदी मालिकारून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कुशलने मराठी सिनेसृष्टीत जशी छाप पाडली तशी तो आता हिंदी सिनेसृष्टीतही पडणार का याकडे साऱ्यांचा नजरा लागून राहिल्या आहेत.

Tags: entertainmentkushal badrikeKushal Badrike Fan Momentkushal badrike postmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Nitish Bhardwaj on daughters

“बाबा म्हणायची लाज वाटते”, महाभारत फेम नितीश भारद्वाज व पत्नीच्या भांडणामध्ये लेकींचा छळ, म्हणाले, “मुलं अशी का करतात हे...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.