‘झी मराठी’ वाहिनीवरील चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने तब्बल दहा वर्ष पप्रेक्षकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमातील प्रत्येक पात्र हे आजही सर्वांच्या लक्षात आहेत. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता, लेखक निलेश साबळेनी स्वीकारली होती. त्याच्या सूत्रसंचालनाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. तसेच या कार्यक्रमामध्ये श्रेया बुगडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके यांनीदेखील आपल्या अभिनयाने सर्व महाराष्ट्राला खळखळून हसवले. मात्र नुकताच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर निलेशचा ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर एक नवीन कार्यक्रम सुरू केला. यावेळी त्याने या कार्यक्रमातील इतर कलाकारांबद्दल भाष्य केले आहे. (nilesh sabale on chala hawa yeu dya actors )
निलेश सध्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमाचा लेखक व सूत्रसंचलन करत आहे. २७ एप्रिलपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानंतर त्याने ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या कार्यक्रमामध्ये त्याच्याबरोबर भाऊ कदम, ओंकार भोजने, स्नेहल शिदम हे दिसले. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडलाच प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. मात्र प्रेक्षकांनी जुनी कलाकार मंडळी नसल्याने अनेक प्रश्न विचारले. मुलाखतीवेळी त्याला विचारण्यात आले की, “तुमच्या या कार्यक्रमामध्ये जून कलाकार म्हणजे श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, सागर कारंडे पुढच्या भागांमध्ये पाहायला मिळतील का?”, त्यावर निलेशने उत्तर दिले की, “हा कार्यक्रम पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे नवीन कलाकार तुम्हाला बघायला मिळत आहे. श्रेया एक उत्तम अभिनेत्री आहे. तसेच भारत व कुशल हेदेखील कमालीचे कलाकार आहेत. पण आता काही तांत्रिक बाबींमुळे आम्ही एकत्र नाही आहोत”.
आणखी वाचा – सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या, नेमकं घडलं तरी काय?
पुढे त्याने सांगितले की, “याचे कारण म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम जेव्हा थांबणार होता तेव्हा तो काही महिन्यांसाठी थांबवण्यात येणार होता. त्यामुळे मी नवीन काहीतरी करूया असा निर्णय घेतला. पण त्यावेळी चॅनलने आमच्याबरोबर एक वर्ष राहण्याचा करार केला होता. त्यामुळे ज्यांनी त्या करारावर सही केली ते सध्या ‘झी वाहिनी’बरोबरच आहेत. पण आम्ही सही न केल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर नाही आहोत”.
दरम्यान निलेशच्या या नवीन कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पण भाऊ ओंकार यांना स्कीट दरम्यान स्त्रीवेशात पाहिल्याने चाहत्यांनी नाराजीदेखील दर्शवली होती.