केसांमधील कोंड्याची समस्या ही सामान्य आहे. मुख्यत्वे हिवाळ्यात ही समस्या आपल्यासाठी डोकेदुखी बनते. या समस्येचा सामना करण्यासाठी आत्तापर्यंत अनेक पद्धती वापरून पाहिल्या असतील, परंतु काही उपयोग झाला नसेल हे नक्की. अशातच एक उपाय तुमच्या केवळ सुंदर केसांसाठी नव्हे तर त्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी मदत करेल. काही वेळा बदलत्या हवामानामुळे किंवा चुकीच्या सौंदर्य उत्पादनांच्या निवडीमुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या सुरु होते. यावर वेळीच उपचार न केल्यास टाळूला ऍलर्जी होऊन केस गळण्याची दाट शक्यता असते. (Hair Routine Update)
प्रत्येक बदलता ऋतू ज्याप्रकारे आनंद घेऊन येतो तसेच तो अनेक समस्याही घेऊन येतो. विशेषतः हिवाळ्यात, जेव्हा आपण खूप गरम पाण्याने आंघोळ करतो तेव्हा ते आपल्या त्वचेपासून तसेच आपल्या टाळूचे तेल शोषून घेतं आणि त्यामुळे टाळू कोरडी होऊ लागते. त्यांनतर त्वचेच्या खपल्या निघतात आणि टाळूवर जळजळ सुरु होते. यामुळे कधीकधी केस गळणेदेखील सुरु होते. जे केसांचे सौंदर्य बिघडवण्याचे काम करते.
केवळ कोरडे किंवा तेलकट टाळूच नाही तर सेबोरेहिक व मॅलेसेझियासारखे बुरशीजन्य संक्रमण देखील कोंडा होण्यास कारणीभूत आहेत. कधीकधी हार्मोनल बदलांमुळे टाळू कोरडी होऊ लागते. त्याच वेळी, प्रथिने, लोह, फायबर व निरोगी चरबीयुक्त आहाराच्या कमतरतेमुळे केस खराब होऊ लागतात आणि टाळूवर खवले तयार होतात. अशा परिस्थितीत काही नैसर्गिक गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही कोंड्याच्या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकता.
कोंड्याच्या समस्येवर एक प्रभावी उपाय म्हणजे भीमसेनी कापूर. २-३ भीमसेनी कापूर चांगले ठेचून घ्या. नंतर एका भांड्यात ते घेऊन त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. त्यांनतर त्यात एक कप गरम खोबरेल तेल घाला आणि आठवड्यातून तीन दिवस ४५ मिनिटे केसांना लावा. त्यानंतर केस शाम्पूने धुवा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. वास्तविक, भीमसेनी कापूरमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात, जे बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतात. तसेच, त्याचे शीतकरण गुणधर्म टाळूला थंडपणा देऊन चिडचिड कमी करण्यास मदत करतात. हे तेल केसांना लावल्याने केसांच्या वाढीस मदत करते.
(टिप – वरील दिलेला उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या.)