आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी दिग्दर्शिका किरण राव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आमिर खानच्या लेकीच्या लग्नात ही किरण राव विशेष सहभाग घेताना दिसली. यानंतर अभिनेत्री तिने दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आली. या मुलाखतीदरम्यान किरण रावने आमिर खानबरोबरच्या नात्याबद्दल भाष्य केलं. किरण राव सध्या तिच्या आगामी ‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपट निर्माती किरण रावने नुकतीच कॅनॉट प्लेस, दिल्ली येथे हजेरी लावली होती. (Kiran Rao On Fire Paan)
किरण रावने यावेळी कॅनॉट प्लेस, दिल्ली येथे प्रथमच फायर पानचा आस्वाद घेतला आणि इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसह तिने हा अनुभव शेअर करत व्हिडीओ शेअर केला आहे.इंस्टाग्रामवर फूड-संबंधित अनेक रील पाहायला मिळतात. उत्तर भारतात प्रसिध्द असलेल्या या हटके फायर पानबद्दल माहिती असण्याची आवश्यकता आहे. किरण रावने तिच्या आगामी ‘लापता लेडीज’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॅनॉट प्लेस, दिल्लीला भेट दिली असता, तिच्या टीमने तिला फायर पान खाण्याचा सल्ला दिला. किरण रावने हा प्रयत्न केला असून याबाबतचा अनुभवही चाहत्यांसह शेअर केला.
किरणने इन्स्टाग्रामवर प्रथमच फायर पान खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि याबरोबरचा तिचा अनुभव शेअर करत म्हटलं आहे की, “कॅनॉट प्लेसमधील पीव्हीआर प्लाझाच्या बाहेर हे गृहस्थ फायर पान बनवतात. त्याचा आस्वाद घ्यायला मला शुरोने भाग पडले. मी नियमित पान खाणं पसंत करते, परंतु हा एक अनुभव आहे, जो एकदातरी घ्यायला हवा. तो पानवालाही खरोखर गोड होता”.
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, किरण राव १९ फेब्रुवारीला ‘लापता लेडीज’च्या प्रमोशनसाठी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सहभागी झाली होती. कार्यक्रमादरम्यान, चित्रपट निर्मात्याला विचारण्यात आले की ती तिचा चित्रपट ऑस्करसाठी पाठवेल का? या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली की, “याची ‘प्राथमिक ओळख’ ही प्रेक्षक कशी स्वीकारतात यावरुन ठरेल.याची प्राथमिक ओळख बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे होते. जर प्रेक्षक व देशाने आमच्या कामाची प्रशंसा केली तर ती आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट ठरेल”.२०११मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धोबीघाट’ चित्रपटानंतर दिग्दर्शिका म्हणून किरण रावने ‘लापता लेडीज’ चित्रपटातून सिनेसृष्टीत कमबॅक केलं आहे. ज्योती देशपांडे यांच्या सहकार्याने स्वतः व आमिर खान यांनी निर्मीत केलेल्या या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव व रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘लापता लेडीज’ हा चित्रपट बिप्लब गोस्वामी यांच्या कथेवर आधारित आहे.