बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

५१ वर्षांचा संसार, एकमेकांवर जीवापाड प्रेम अन्…; वंदना गुप्तेंनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्यासह शेअर केला रोमँटिक फोटो, म्हणाल्या, “इतकी वर्ष…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 22, 2024 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vandana Gupte Wedding Anniversary

५१ वर्षांचा संसार, एकमेकांवर जीवापाड प्रेम अन्...; वंदना गुप्तेंनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्यासह शेअर केला रोमँटिक फोटो, म्हणाल्या, "इतकी वर्ष..."

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी त्यांच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमातून त्यांनी अभिनयाची छाप पाडत प्रेक्षकांची मनं जिंकली. काही दिवसांपूर्वी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारा ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील वंदना यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. याशिवाय वंदना यांच्या ‘चारचौघी’ या नाटकानेही रंगभूमी गाजवलेली पाहायला मिळत आहे. शुटींगच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून त्या मनसोक्त त्यांचं आयुष्य जगताना नेहमीच पाहायला मिळतात. (Vandana Gupte Wedding Anniversary)

सोशल मीडियावरही वंदना गुप्ते बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वंदना यांनी शेअर केलेली ही पोस्ट त्यांच्या पतीसाठी आहे. आज वंदना गुप्ते व शिरीष गुप्ते यांच्या लग्नाला ५१ वर्ष पूर्ण झाली आहेत. याबाबत पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – मेहंदी रंगली गं! क्षितिजा घोसाळकरच्या हातावर रंगली प्रथमेशच्या नावाची मेहंदी, खास डिझाइन अन् कानातल्या दागिन्यांची होतेय चर्चा

View this post on Instagram

A post shared by Vandana Gupte (@vandanagupteofficial)

वंदना यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांचा लग्नातील फोटो व आताचा एकत्र एक फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली कॅप्शन देत त्यांनी “आमच्या लग्नाचा ५१वा वाढदिवस आहे. आम्ही एकत्र इतकी वर्षे घालवली यावर विश्वासच बसत नाही. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत शिरीषने दिलेला पाठिंबा माझ्या यशाचा कणा होता. मनोरंजन उद्योगात ५२ वर्षे. गृहिणी व थिएटर ॲक्टिव्हिटीज या नात्याने बांधिलकीची मागणी करणारा वेळ हाताळणे सोपे नाही. सर्व गोष्टींसाठी शिरीष धन्यवाद”, असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – समुद्रकिनारी रोमान्स, पारंपरिक लूक अन्…; लग्नाला दोन महिने पूर्ण होताच मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने शेअर केला सर्वात सुंदर व्हिडीओ, रंगतेय चर्चा

वंदना यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्यावर्षी लग्नाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त वंदना गुप्ते पती शिरीष गुप्ते यांच्यासह विवाहबंधनात अडकल्या. लग्नाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त दोघांनी त्यांचा छोटेखानी विवाह सोहळा उरकला. सर्व कुटुंबियांच्या साक्षीने त्यांचा हा विवाहसोहळा संपन्न झाला होता.

Tags: entertainmentmarathi actressvandana guptevandana gupte husbandVandana Gupte Wedding Anniversary
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Abdu Rozik And Shiv Thakare Summoned By Ed

'बिग बॉस' फेम शिव ठाकरेला मोठा धक्का, ईडीकडून अभिनेत्याला समन्स, नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.