बॉलिवूडमधील नेहा कक्कर ही नेहमीच चर्चेत असते. आजवर तिच्या गायनाने सगळ्यांचेच मनोरंजन केले आहे. तिच्या आवाजाचे जगभरात चाहते आहेत. काही वर्षांपूर्वी ती पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहबवरोबर लग्नबंधनात अडकली. तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या खासगी आयुष्यदेखील चांगलेच चर्चेत आले आहे. नेहा व रोहनप्रीत हे वेगळे होणार असल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे. आता रोहनप्रीतने यावर भाष्य केले आहे. त्याने दोघांच्याही नाट्यावर भाष्य केले आहे. यावेळी त्याला घटस्फोटाच्या अफवांबद्दल विचारले गेले. (neha kakkar divorce news)
रोहनप्रीत व नेहा हे दोघंही संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. आजवर नेहाच्या गरोदरपणाची चर्चादेखील खूप रंगली होती. अशातच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चावर त्याने स्वतः भाष्य केले. ‘इन्स्टन्ट बॉलिवूड’बरोबर त्याने संवाद साधला. यावेळी त्याने सांगितले की, “अफवा या अफवा असतात. त्या थोडी खऱ्या असतात. गोष्टी तयार केल्या जातात. उद्या कोणीतरी काहीतरी सांगेल, कोणीही काहीही बोलेल. पण या सगळ्याचा खासगी आयुष्यावर कोणताही परिणाम होऊ देऊ नये”.
तसेच त्याने पुढे सांगितले की, “अशा प्रकारच्या अफवांवर कधीही विश्वास ठेऊ नये. अशा गोष्टींमुळे कधीही वाईट वाटून घेऊ नका. लोकांचं काम आहे ते त्यांना करुदे. आमचं आयुष्य तर सुरु आहे. आम्ही आमच्या हिशोबाने जगतो. जर एखाद्या गोष्टीत खरच काही तथ्य असेल तरच त्या बोलाव्यात. पण आपल्याबद्दल कोणीही काहीही बोलत असेल तर तुमची प्रगती होत आहे असं समजून जा”.
नेहा व रोहनप्रीत यांनी २०२० साली लग्न केले. गेल्या काही दिवसांपासून दोघंही कुटुंबाचा विचार करत असल्याचे बोलले जात होते. गेल्या वर्षी नेहा गरोदर असल्याच्या तसेच दोघंही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. नुकतीच रोहनप्रीतने नेहाच्या वाढदिवसासाठी एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमुळे दोघांमध्ये सगळं काही सुरळीत सुरु असल्याचेदेखील दिसून आले होते.