शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राखी सावंतला किस करण्यावरुन मोठा वाद, प्रकरण कसं संपलं?, मिका सिंह म्हणाला, “तिनेही गालावर किस करत…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 24, 2024 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mika singh on rakhi sawant kiss in incedence

राखी सावंतच्या किस प्रकरणावर मिका सिंहचं भाष्य

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक  मिका सिंह नेहमी चर्चेत असलेला बघायला मिळतो. आजवर मिकाने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्याच्या गाण्यांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. मात्र त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असलेला बघायला मिळाला आहे. तो त्याच्या विधानांमुळे अधिक चर्चेत असलेला पाहायला मिळाला आहे. अनेकदा तो असे काही बोलून जातो ज्यामुळे तो अडकून जातो. २००६ साली मिकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओमुळे खूप चर्चादेखील रंगल्या होत्या. या व्हिडिओमध्ये वाढदिवसांच्या दिवशी मिकाने राखी सावंतला कीस केले होते. राखी व मिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (mika singh on rakhi sawant kiss in incedence)

मिका व राखीचा किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राखीने मिकाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आता इतक्या वर्षांनी मिकाने या सगळ्या प्रकरणावर असलेले मौन सोडले आहे. मिकाने नुकताच ‘लल्लनटॉप’शी संवाद साधला. यामध्ये त्याने किस प्रकरणावर भाष्य केले आहे. तो म्हणाला की, “माझा वाढदिवस होता. वाढदिवस काय असतो? हे मला माहीत पण नव्हतं. इथे पार्टी असायची. खूप सारे लोक यायचे. पीआरच्या माध्यमातून तुम्ही कोणालाही बोलावू शकता. राखीने मला केक लावण्याचा प्रयत्न केला. माझा कोणताही हेतू नव्हता. मी तिला पाहिलं तर ती गालावर किस करत होती”.

आणखी वाचा – प्रसिद्ध गायिकेने मध्येच बंद केला लाईव्ह कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागितली आणि मंचावरुन उतरली, नक्की झालं तरी काय?

View this post on Instagram

A post shared by Mika Singh (@mikasingh)

पुढे तो म्हणाला की, “मी किस नाही केलं. मी तुम्हाला कसं पटवून देऊ? मी ओठांवर हात ठेऊन किस केलं. राखी खुश होती. पण त्या घटणेनंतर माझे काही शत्रू होते त्यांनी राखीला माझ्या विरोधात जाऊन केस करण्यासाठी सांगितले. आम्ही तिला खूप समजावलंदेखील. नंतर २०२२ साली माझी ही केस संपली”.

आणखी वाचा -प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन, वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

नंतर तो म्हणाला की, “तसं या केसमध्ये काहीही नव्हतं. एक मित्र दुसऱ्या मित्राला किस करू शकतो. ही पूर्ण केस प्रेमानेच संपली. अनेकांना मिकाच्या विरोधात काहीतरी केस व्हावी असं वाटत असल्याचंही राखीने सांगितलं”. दरम्यान आता राखी व मिका एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सोशल मीडियावर अनेकदा ते एकत्रित पाहिले जातात.  

Tags: kiss controversymika singhrakhi sawant
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Tula shikvin changlach dhada serial update Bhuvaneshwari is going to increase the misunderstanding between Adhipati Akshara

अधिपती अक्षरामधील गैरसमज अधिक वाढणार, भुवनेश्वरी ठरणार कारण, नवीन ट्विस्टवर प्रेक्षकही नाराज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.