मनोरंजन क्षेत्रामध्ये लग्न, प्रेम, घटस्फोट या सगळ्या सामान्य गोष्टी झाल्या आहेत. अनेकदा बॉलिवूड कलाकार त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. अनेक कलाकार तर त्यांच्या एकापेक्षा अनेक लग्नामुळे अधिक चर्चेत राहिले आहेत. अशातच या कलकारांमध्ये समाविष्ट असणाऱ्या अशा कलाकाराबद्दल जाणून घेऊया ज्याची संगीत क्षेत्रात कमालीची लोकप्रियता आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांसाठी गाणी तयार केली असून तो एक गायक म्हणूनही अधिक लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे तो काही चित्रपटांमध्येही काम करताना दिसून आला आहे. (himesh reshammiya second marriage)
हा सतत चर्चेत असणारा कलाकार म्हणजे प्रसिद्ध गायक, संगीत निर्माता हिमेश रेशमिया. हिमेशने आजवर अनेक हिंदी चित्रपटांसाठी गाणी तयार केली आहेत. त्याच्या गाण्यांना कमालीची लोकप्रियतादेखी मिळाली आहे. मात्र कामाबरोबरच त्याचे खासगी आयुष्य अधिक चर्चेत राहिले आहे. हिमेश पहिल्या पत्नीपासून तब्बल २२ वर्षांनी वेगळा झाला. त्यानंतर ४५ व्या वर्षी तो पुन्हा एकदा बोहल्यावर चढला. त्याच्या पहिल्या पत्नीपेक्षा दुसरी पत्नी अधिक चर्चेत राहिली आहे. पण त्याचे नक्की कारण काय? हे आता जाणून घेऊया.
आणखी वाचा – घटस्फोटानंतर असं जीवन जगत आहे हार्दिक पांड्याची पूर्वश्रमीची पत्नी, कसा भागवते खर्च?
हिमेशच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचे झाले तर १९९५ साली तो कोमलबरोबर लग्नबंधनात अडकला. मात्र काही कारणांमुळे त्यांच्यामध्ये मतभेद झाल्याने २२ वर्षांचा संसार मोडला. २०१७ साली त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर २०१८ साली टेलिव्हिजन अभिनेत्री सानिया कपूरबरोबर लग्न केले. सानिया ही हिमेशची पहिली पत्नी कोमलची मैत्रीणही होती.
हिमेशचा आज वाढदिवस असून तो आता ५१ वर्षाचा झाला आहे. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता ज्यावेळी हिमेशच्या सगळ्याच गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. आज इतके वर्ष झाले तरीही त्याच्या गाण्यांची जादू आजही पाहायाल मिळत आहे. ‘प्यार किया तो डरना क्या?’ या चित्रपटाच्या गाण्यांची निर्मिती केली होती. या चित्रपटांमध्ये सलमान खान, अरबाज खान व काजोल हे कलाकार होते. ही गाणी आजही खूप पसंत केली जातात.