झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. गेल्या दीड वर्षांपासून ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार यांची फ्रेश ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा तर अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपतीची भूमिका साकारली आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या भागात अक्षराने अधिपतीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. अक्षरा व अधिपतीच्या सुखी संसारात विघ्न आणण्यासाठी भुवनेश्वरी कायम नवनवीन डाव रचत असते. या दोघांनाही घराबाहेर काढून भुवनेश्वरीने त्यांची परीक्षादेखील घेतली. परंतु, आता लवकरच मालिकेत एक नवीन वळण येणार आहे. चारुहास भुवनेश्वरीला घराबाहेर काढणार आहे. नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये चारूहास तिला धमकी देत आहेत. मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – घटस्फोटानंतर असं जीवन जगत आहे हार्दिक पांड्याची पूर्वश्रमीची पत्नी, कसा भागवते खर्च?
नुकत्याच आलेल्या या नवीन प्रोमोमध्ये चारुहास भुवनेश्वरीचा हात धरत तिला घराच्या बाहेर काढतात. “तुला माझ्या घरात स्थान नाही असं म्हणत” ते भुवनेश्वरीला घराबाहेर हाकलून देतात. मात्र भुवनेश्वरीदेखील चारुहासला तिच्या अंदाजात सजग करते. घराबाहेर पडताच भुवनेश्वरी “आज मला घराबाहेर काढत आहात. ही खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. तुम्हाला एक दिवस गुडघ्यावर नाही आणलं तर नावाची भुवनेश्वरी नाही” असं म्हणते.
आणखी वाचा – Video : थायलंडमध्ये अक्षरा-अधिपतीचा हनिमून, समुद्रकिनारी जोडप्याचा रोमान्स, व्हिडीओ पाहून प्रेक्षकही भारावले
मालिकेतील हा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत आलेले हे अनपेक्षित वळण सर्वांनाच चकित करणारे आहे. एकीकडे अधिपतीचे आईविषयी आईबद्दलचे अतिप्रेम आहे, तर दुसरीकडे चारुहासचा भुवनेश्वरीबद्दलचा राग आहे. अशातच चारुहासने केलेल्या या कृत्यावर अधिपतीची प्रतिक्रिया काय असणार? हे आगामी भागांत पाहायला मिळेल.