शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कुत्र्यासारखा झोपतो…”, सुप्रसिद्ध बॉलिवूड गायकाने सलमान खानला दारुड्या व फालतू म्हणून हिणावलं, इतका राग का?

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 23, 2024 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhijeet Bhattacharya on salman khan

अभिजीत भट्टाचार्यची सलमान खानवर टीका

सध्या बॉलिवूड अभिनेता सलमान खान खूप चर्चेत आहे. गायक अभिजीत भट्टाचार्यने सलमानवर निशाणा साधला आहे. गेल्या अनेक दिवसांनपासून अभिजीतने सलमानबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये अभिजीतने सलमान खान व शाहरुख खान यांच्याबद्दल खूप काही सांगितले आहे. यावेळी त्याने टायगर असे नाव घेऊन सलमानला ठरकी व दारुबाज असल्याचे म्हंटलं आहे. याआधी त्याने सलमानच्या बाबतीत काही सांगण्यासारखं नाही असं म्हंटलं होतं. नंतर त्याने हिट अँड रन प्रकरणावर भाष्य केले आहे. तसेच याआधी केल्या गेलेल्या प्रतिक्रियांवरही भाष्य केले आहे. तो आता काय म्हणाला आहे ते जाणून घेऊया. (Abhijeet Bhattacharya on salman khan)

अभिजीतने शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सलमानच्या हिट अँड रन प्रकरणाबद्दल विचारले, यामध्ये गायकाने अभिनेत्याला पाठिंबा दिल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. या सगळ्या चर्चा अभिजीतने फेटाळल्या आहेत. तो म्हणला की, “जर कोणी रस्त्यावर झोपत असेल तर एखादा दारुडा किंवा बेजबाबदार व्यक्ती त्यांच्यावर गाडी चढवणार”.

आणखी वाचा – महिलेचा मृत्यू होऊनही थिएटरमध्ये ‘पुष्पा २’ बघत राहिला अल्लू अर्जुन, सीसीटीव्ही फुटेज हाती, पोलिसांचा मोठा खुलासा

View this post on Instagram

A post shared by Abhijeet Bhattacharya (@abhijeetbhattacharya)

नंतर अभिजीत म्हणाला की, “मी त्याला पाठिंबा दिला? कधीच नाही. याआधीदेखील ट्रकने चार लोकांना चिरडल्याचे समोर आले होते. हे रोज होत आहे. व्यक्ती रस्त्यावर झोपत आहेत फुटपाथवर नाही. मी म्हणालो की रस्त्यावर झोपाल तर दारुडा दारु पिऊन येईल आणि तुमच्यावर गाडी चढवेल. रस्त्यावर कुत्र्यासारखे झोपत आहात. त्यामुळे दारुबाज व फालतू तिथे येणार. मग माझ्याकडून तुम्ही असे का करवून घेत आहात?”.

आणखी वाचा – ‘पुष्पा २’ प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, घोषणा आणि तोडफोड करत नुकसान, नेमकं काय झालं?

दरम्यान याचवेळी अभिजीतला विचारले की, “सलमानच्या गाण्यांसाठी ‘टन टना टन’ व ‘चुनरी’ ही गाणी का गायली? त्यावर अभिजीतने उत्तर दिले की, “मी गाणी गाण्याआधी कोणत्या कलाकारासाठी गात आहे? असं कधीही विचारत नाही. जर कोणी म्हणालं की चित्रपट येणार आहे त्यामध्ये गाणं गाणार का? तर मी गाणं गाऊन येणार. मला नाही माहीत मी कोणासाठी गाणार आहे ते”. दरम्यान आता अभिजीतने सलमानबद्दल खूपच खोचक वक्तव्य केली आहेत. सलमान यावर काय प्रतिक्रिया देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: abhijeet bhattacharyahit and run casesalman khan
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
dilijit dosanjh mumbai concert

दिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये महिलेबरोबर गैर प्रकार, चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, पोस्ट व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.