बॉलिवूडचा बच्चन परिवार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बच्चन कुटुंबियांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या सौंदर्यासाठी नेहमी चर्चेत असते. तिची लेक आराध्यादेखील तिच्या आई इतकी सुंदर आहे. या दोघी नेहमी चर्चेत असतात. मायलेकीची जोडी सगळीकडे एकत्र पाहायला मिळते. ऐश्वर्या कधी कोणत्या कार्यक्रमाला तिच्या लेकीशिवाय जात नाही. नुकताच त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. एवढंच नाही तर मायलेकीने भन्नाट डान्स ही केला सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Aishwarya aaradhya dance video)
एका कार्यक्रमात ऐश्वर्या व आराध्या सुंदर ड्रेसमध्ये पाहायला मिळाले. ऐश्वर्याने काळ्या रंगाचा अनारकली ड्रेसमध्ये तर आराध्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एका कार्यक्रमात पोहोचले होते. ‘कयामत कयामत’ या बॉलिवूडच्या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना या दोघी दिसल्या. तर त्यांच्या मागे अभिनेत्री जिनिलीयादेखील पाहायला मिळाली. पण या कार्यक्रमात ऐश्वर्य-आराध्या या आई-मुलीच्या सुंदर जोडीने सगळ्यांच लक्ष वेधलं. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
Moments that twirl with love and joy! Aishwarya Rai and her daughter share a magical dance, creating memories that will forever dance in their hearts. ????????✨#Aishwaryarai #AishwaryaRaiBachchan #Bollywood #AliaBhatt #WATCH #ViralVideos pic.twitter.com/9wF8JcZ1UF
— Jadolya (@JadolyaNews) December 4, 2023
नेटकऱ्यांनीही कमेंट करत कौतुक केलं आहे तर काहींनी ऐश्वर्याला ट्रोलही केलं आहे. एक नेटकऱ्याने कमेंट केली की, ‘सगळ्यात सुंदर स्त्री’, असं लिहीत कौतुक केलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘त्या आपल्या मुलीबाबत बऱ्याच असुरक्षित आहेत. कधीतरी स्वतःच्या मुलीला निवांत राहू द्या, ऐश्वर्या मॅडम’, असं लिहीत त्याने तिच्यातील आईच्या प्रेमाबद्दल वक्तव्य करत तिला ट्रोल केलं आहे.
बच्चन कुटुंबियांची लेक असल्यामुळे आराध्या नेहमीच चर्चेत असते. आराध्याचा जन्म २०११ मध्ये झाला. नुकत्याच झालेल्या तिच्या वाढदिवसादिवशी ऐश्वर्याने तिच्या लेकीबाबतचं प्रेम व्यक्त केलं होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ‘मी फक्त तुझ्यासाठी जगत आहे’, असं लिहीत ऐश्वर्याने तिच्या लेकीचा फोटो पोस्ट केला होता. यासगळ्यात ऐश्वर्या तिच्या मुलीला घेऊन सासरपासून लांब राहत असल्याचं बोललं जात आहे. तिच्या व अभिषेकच्या नात्यात सगळं काही ठीक नसल्याचं समोर येत आहे. त्यात ती बऱ्याचदा तिच्या लेकीबरोबरच एकटीच पाहायला मिळते. यासगळ्या गोष्टींची अजून पुष्टी झालेली दिसत नाही.