सध्या बॉलिवूड कलाकार अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन हे सध्या अधिक चर्चेत आहेत. लग्नाला १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. अशातच आता काही महिन्यांपासून दोघांमध्ये मतभेद असलेले पाहायला मिळाले. दोघंही घटस्फोट घेऊन वेगळे होणार असेही सांगण्यात येऊ लागले होते. मात्र या सगळ्यावर ऐश्वर्या व अभिषेक यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. काही दिवसांपूर्वी अभिषेकने अजून विवाहित असल्याचे सांगितले होते. त्यावरुनही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली होती. अशातच आता त्यांच्याबद्दलची अजून एक अपडेट समोर आली आहे. (abhishek bachchan and aishwarya rai viral video)
अभिषेकने साखरपुड्याची अंगठी दाखवत घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लावला. तसेच आता दीर्घकालावधीनंतर अभिषेक व ऐश्वर्या एकत्रित स्पॉट केले गेले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर येताच त्यांचे वैवाहिक आयुष्य चांगले सुरु असल्याचे बोलले जात आहे.
ऐश्वर्या व अभिषेक यांना दुबई एअरपोर्टवर एकत्रित पाहिले गेले. त्यांच्याबरोबर मुलगी आराध्यादेखील होती. सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये तिघही दुबई एअरपोर्टमध्ये एंट्री करताना दिसत आहेत. यामध्ये आधी अभिषेक त्याच्यामागे ऐश्वर्या व आराध्यादेखील दिसून येत आहेत. एका फॅन पेजद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अभिषेक व आराध्याबरोबर ऐश्वर्या खूप खुश असलेली दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद असल्याचेदेखील समजून येत आहे. तसेच सर्वजण एकत्रित चांगला वेळदेखील घालवताना दिसत आहेत. तसेच घटस्फोटाच्या चर्चांवर दोघांनीही भाष्य करणे टाळलं आहे.
ऐश्वर्या व अभिषेक २००७ साली लग्नबंधनात अडकले होते, २०११ साली त्यांना मुलगी झाली. आराध्याला नेहमीच ऐश्वर्याबरोबर पाहायला मिळाली. कोणत्याही कार्यक्रमात किंवा पुरस्कार सोहळ्याप्रसंगी त्यांना एकत्रित पाहिले गेले. मात्र अनंत अंबानी व राधिक मर्चंट यांच्या लग्नाच्या वेळी दोघही वेगवेगळे आल्याने त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित राहिले होते. मात्र आता दोघांना एकत्रित बघून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.