शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनचा घटस्फोटाच्या फक्त चर्चा की सत्य?, दोघांना एकत्र पाहिल्यानंतर घडलं असं की…; व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 2, 2024 | 4:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
abhishek bachchan and aishwarya rai viral video

ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांचा एकत्रित व्हिडीओ व्हायरल

सध्या बॉलिवूड कलाकार अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन हे सध्या अधिक चर्चेत आहेत. लग्नाला १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. अशातच आता काही महिन्यांपासून दोघांमध्ये मतभेद असलेले पाहायला मिळाले. दोघंही घटस्फोट घेऊन वेगळे होणार असेही सांगण्यात येऊ लागले होते. मात्र या सगळ्यावर ऐश्वर्या व अभिषेक यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.  काही दिवसांपूर्वी अभिषेकने अजून विवाहित असल्याचे सांगितले होते. त्यावरुनही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली होती. अशातच आता त्यांच्याबद्दलची अजून एक अपडेट समोर आली आहे. (abhishek bachchan and aishwarya rai viral video)

अभिषेकने साखरपुड्याची अंगठी दाखवत घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लावला. तसेच आता दीर्घकालावधीनंतर अभिषेक व ऐश्वर्या एकत्रित स्पॉट केले गेले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर येताच त्यांचे वैवाहिक आयुष्य चांगले सुरु असल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा – “आई आणि बाबा रिटायर होत आहेत” निवेदिता सराफांची नवी मालिका, प्रेक्षक म्हणाले, “नवीन असावरी…”

View this post on Instagram

A post shared by Aishwarya rai (@aishwaryaraibachchan_arb___)

ऐश्वर्या व अभिषेक यांना दुबई एअरपोर्टवर एकत्रित पाहिले गेले. त्यांच्याबरोबर मुलगी आराध्यादेखील होती. सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये तिघही दुबई एअरपोर्टमध्ये एंट्री करताना दिसत आहेत. यामध्ये आधी अभिषेक त्याच्यामागे ऐश्वर्या व आराध्यादेखील दिसून येत आहेत. एका फॅन पेजद्वारे हा  व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अभिषेक व आराध्याबरोबर ऐश्वर्या खूप खुश असलेली दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद असल्याचेदेखील समजून येत आहे. तसेच सर्वजण एकत्रित चांगला वेळदेखील घालवताना दिसत आहेत. तसेच घटस्फोटाच्या चर्चांवर दोघांनीही भाष्य करणे टाळलं आहे.

आणखी वाचा – घरातील नव्या पाहुण्यासाठी मायरा वायकुळ उत्सुक, आईच्या प्रेग्नन्सी फोटोशूटमध्ये धमाल अन्…; व्हिडीओ समोर

ऐश्वर्या व अभिषेक २००७ साली लग्नबंधनात अडकले होते, २०११ साली त्यांना मुलगी झाली. आराध्याला नेहमीच ऐश्वर्याबरोबर पाहायला मिळाली. कोणत्याही कार्यक्रमात किंवा पुरस्कार सोहळ्याप्रसंगी त्यांना एकत्रित पाहिले गेले. मात्र अनंत अंबानी व राधिक मर्चंट यांच्या लग्नाच्या वेळी दोघही वेगवेगळे आल्याने त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित राहिले होते. मात्र आता दोघांना एकत्रित बघून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.     

Tags: abhishek bachachanAISHWARYA RAIdubai airport
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Singer and rapper yo yo Honey Singh said that he is now ashamed of old songs see the details

हनी सिंहने स्वतःच्याच गाण्यांना ठरवलं फालतू, ‘ब्लू है पानी पानी’, ‘लुंगी डान्स’ला अर्थच नाही बोलला, म्हणाला, “रात्रभर पार्टी…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.