शनिवार, सप्टेंबर 5, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अश्लील, कौटुंबिक विनोद करुन…”, स्टँडअप कॉमेडीवरुन सलील कुलकर्णींचा संताप, नक्की रोख कोणाकडे?, म्हणाले, “प्रत्येक वाक्यात शिव्या…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 6, 2024 | 3:48 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Saleel Kulkarni shared satirical post about standup comedy see the details

"अश्लील, कौटुंबिक विनोद करुन...", स्टँडअप कॉमेडीवरुन सलील कुलकर्णींचा संताप, नक्की रोख कोणाकडे?, म्हणाले, "प्रत्येक वाक्यात शिव्या..."

स्टँडअप कॉमेडी सध्या खूप लोकप्रिय होत आहे. कॉमेडी शोपेक्षा स्टँडअप कॉमेडी शोची लोकांमध्ये जास्त चर्चा होते. गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये याची क्रेझ चांगलीच वाढली आहे. आजवर अनेक मराठीसह हिंदीमध्ये स्टँड अप कॉमेडी करणारे अनेक कॉमेडियन आहेत, ज्यांनी त्यांच्या विनोदी सादरीकरणांनी आपला वेगळाच ठसा उमटवला आणि लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले आहे.

खरंतर स्टँडअप कॉमेडीला जुना इतिहास आहे, पू. ल. देशपांडेंनी मराठी स्टँडअप कॉमेडीची सुरुवात केली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. पु. ल. देशपांडे यांच्या ‘म्हैस’, ‘अंतु बरवा’, ‘बटाट्याची चाळ’ या कलाकृती रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्या. एका सभागृहाच्या मंचावर उभे राहून, पु.लं.नी सादर केलेल्या या कलाकृती म्हणजे मराठीतील पहिली स्टँड अप कॉमेडीच म्हणावी लागेल. परंतु काळापरत्वे यात अनेक बदल होत गेले.

हल्ली स्टँडअप कॉमेडी करण्यासाठी कॉमेडियन कोणत्याही पातळीला जातात. विनोद करताना शिव्यांचा सर्रास वापर, प्रेक्षकांची खिल्ली उडवणे, एखाद्या व्यंगावर विनोद करणे हे प्रकार खूपच वाढले आहेत. यावर गायक, संगीतकार सलील कुलकर्णींनी एक उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे. सलील कुलकर्णींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांचा एक फोटो पोस्ट करत ही पोस्ट लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Saleel Kulkarni (@saleelkulkarniofficial)

सलील यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “स्टँडअप कॉमेडीचे क्लासेस निघाले आहेत असं आत्ता ऐकलं. कौटुंबिक विनोद.. अश्लील विनोद… राजकीय विनोद… प्रेक्षकांना प्रश्न विचारून त्यांची टर उडवणे, प्रत्येक वाक्यात शिव्या आणि आपापली स्थानिक भाषा वापरणे म्हणजेच विनोद करणे… असे अनेक प्रकार आहेत असे सूत्रांनी सांगितले”.

आणखी वाचा – Video : मराठीमधील आणखी एका जोडप्याचं ठरलं लग्न, केळवणालाही सुरुवात, अभिनेता आहे सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा लेक, व्हिडीओ व्हायरल

यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “शिक्षण.. व्यक्तिमत्त्व.. आवाज.. कसलीही अट नाही.. आपण विनोदी आहोतच, आपणच विनोदी आहोत आणि आपण बोलतोय ते तुफान विनोदीच आहे हा आत्मविश्वास आणि प्रत्येक वाक्यानंतर त्यातला विनोद शोधून समोरच्या लोकांमधला एखादा माणूस तरी हसेपर्यंत आपण गप्प राहून मिश्किल किंवा बधीर चेहरा करून बघत राहायची तयारी ठेवणे एवढीच काय ती अट असते.”

आणखी वाचा – हिंदी शोमध्ये कुशल बद्रिकेची एन्ट्री, निलेश साबळेनंतर ‘चला हवा येऊ द्या’ सोडणार असल्याच्या चर्चांवर दिलं उत्तर, म्हणाला, “मी शोमध्ये…”

या पोस्टसह सलील यांनी “उभे राहून काहीही बोला त्याला विनोद म्हणा” असा एक हॅशटॅगदेखील लिहिला आहे. दरम्यान सलील यांनी या पोस्टद्वारे नक्की कुणावर निशाणा साधला आहे? हे कळले नाही. पण त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.   

Tags: सलील कुलकर्णीस्टँडअप कॉमेडी बातमीमनोरंजन बातमीमराठी संगीतकारमराठी गायकमराठी मनोरंजन बातमीमराठी बातमीउपहासात्मक पोस्टentertainment newsmarathi entertainment newsMarathi MusicianMarathi newsmarathi singersaleel kulkarniSatire Poststandup comedyStandup Comedy News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Oscar 2024 Award

Oscar 2024 : भारतात कधी आणि कुठे लाइव्ह पाहता येणार ऑस्कर पुरस्कार सोहळा, तारीख, वेळ जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.