बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानने आजवर त्याच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आमिर खानचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. बरेचदा आमिर खान त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला असल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेषतः आमिर त्याच्या व त्याच्या पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावमुळे चर्चेत आला असल्याचं पाहायला मिळालं आहे. किरण राव व आमिर खान यांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले आहेत. असं असलं तरी बरेचदा ते एकत्र स्पॉट होताना दिसले आहेत. (Kiran Rao On Aamir Khan)
आमिर व किरण राव वेगळे झाले असले तरी नेहमीच ते कामानिमित्त एकत्र आलेले पाहायला मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वीच आमिर खान व किरण यांनी मिळून लापता लेडीज या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ही जोडी बरेच ठिकाणी एकत्र दिसली. इतकंच नव्हेतर आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नातही किरण राव सहभागी झाली होती. अनेकदा मीडियासमोर किरण आमिरबद्दलच्या नात्यावरुन भाष्य करत असते. लग्नाच्या १६ वर्षानंतर दोघांनी एकत्र निर्णय घेत घटस्फोट घेतला.
अशातच किरण रावने ‘सकाळ न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खानबरोबर कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. किरण रावने म्हटलं की, “आमची मैत्री खूप निरागस आहे. आम्ही नेहमीच एकत्र काम करतो. पाणी फाऊंडेशनसाठी आम्ही एकत्र काम करत आहोत. कारण आम्हाला एकमेकांसह काम करायला आवडतं. एकमेकांबद्दल आमच्या मनात खूप आदर आहे. हे माझे कुटुंब आहेत. त्यामुळे यांच्यासह काम करायला मला आवडतं. संपूर्ण आयुष्यभर त्यांच्याबरोबर काम करायला मला आवडेल. आणि मला त्यांच्याबरोबर राहायलाही आवडेल. त्यांच्या अवतीभोवती कायम राहायचं आहे. या सूर्याभोवती मला कायम फिरत राहायला आवडेल”.
किरण खासगी तसेच व्यावसायिक आयुष्याबद्दल नेहमीच दिलखुलासपणे व्यक्त होत असते. आमिरबद्दल कौतुक करताना ती कधीही थांबत नाही. त्यांचा जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा आमिरने सर्व परिस्थिती अत्यंत व्यवस्थितपणे हाताळली असल्याचेही तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.