soha ali khan diet : कलाकार मंडळी म्हटलं की फिटनेस हा आलाच. निरोगी, सुदृढ राहण्यासाठी ही कलाकार मंडळी अनेक प्रयत्न करतात. त्यांचं रोजचं रुटीन, डाएट, व्यायाम यासारख्या गोष्टींवर ते अधिक लक्ष केंद्रित करतात. खासकरुन बॉलिवूड कलाकार त्यांच्या फिटनेसबाबत अधिक जागरूक असतात. अभिनेत्री सोहा अली खान लोकांना नेहमीच निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास जागरुक करत राहते. याबद्दल, तिने गुरुवारी सोशल मीडियावर चाहत्यांना सांगितले की ती सकाळी रिकाम्या पोटावर काय खाण्याला प्राधान्य देते. अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना दररोज सकाळी रिकाम्या पोटी काय खाल्ले पाहिजे याचे तिने दोन पर्याय दिले. हे दोन पर्याय म्हणजे भिजवलेला बदाम आणि लसूण.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती लसूण खाताना दिसत आहे. सोहाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ती कच्चा लसूण खाताना दिसली. आणि तिच्या व्हिडीओच्या पोस्टवर असं लिहिण्यात आलं होतं की, “दररोज सकाळी मी रिकाम्या पोटावर काय खाते ते मी तुम्हाला सांगू शकते, भिजलेले बदाम किंवा लसूण”.
काही दिवसांपूर्वी, ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेत्रीने सांगितले होते की, ती गेल्या तीन महिन्यांपासून रिकाम्या पोटावर पांढर्या भोपळ्याचा रस पित आहे. अभिनेत्रीने पांढरा भोपळ्याचा रस बनवतानाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला, ज्यामध्ये तिने सकाळच्या दिनचर्याबद्दल एक झलक दर्शविली. तिने व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये असं लिहिले की, “सेल्फ लव्ह खूप महत्वाचे आहे. मी गेल्या तीन महिन्यांपासून दररोज सकाळी पांढरा भोपळा रस पित आहे. हा रस पोटासाठी खूप फायदेशीर आहे.”
सोहा अली खान यांनी स्वयंपाकघरात घालवलेल्या काही क्षणांची एक झलक शेअर केली. स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर दोन प्रामाणिक फोटो पोस्ट केले. यावेळी तिने काय बनवत आहे याची पुष्टी केली नाही. ‘छोरी 2’ च्या प्रमोशनदरम्यान आईएएनएसशी केलेल्या संभाषणात सोहा अली खान यांनी सांगितले की तिला स्वयंपाक करण्यात काहीच रस नाही. ती म्हणाली होती, “स्वयंपाकघरची जबाबदारी तिचा नवरा कुणाल खेमु यांनी हाताळली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती बर्याचदा स्वयंपाक करण्याचे नाटक करते.





