Shibani Dandekar Pregnancy : फरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकर प्रेग्नंट असून ती लवकरच पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहेत. या बातम्यांवर फरहान किंवा शिबानी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी शबाना आझमी यांनी या चर्चांमागील सत्य सांगितले आहे. या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले असून या चर्चांना एकप्रकारे पूर्णविरामच दिला आहे. शिबानी गरोदर नाही, असं त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे. फरहान व शिबानीने २०२२ साली लग्न केले आणि सोशल मीडियावर अनेकदा रोमँटिक फोटो शेअर केले.
फरहान अख्तरचे पहिले लग्न अधुनाबरोबर झाले होते. अधुना व फरहान यांना दोन मुली आहेत. पण फरहान व अधुना यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. यानंतर त्याने शिबानीशी लग्न केले आणि तो विवाहित आयुष्याचा आनंद घेत आहे. मात्र फरहान व शिबानी यांनी अद्याप स्वत:चा संसार सुरु केलेला नाही. अशात जेव्हा शिबानी प्रेग्नंट असल्याची बातमी आली तेव्हा चाहते त्यांच्याकडे डोळे लावून बसले.
मात्र, फरहानची सावत्र आई शबाना आझमी यांनी या चर्चांबाबत सर्व काही स्पष्ट केले आहे. ‘इटाइम्स’शी बोलताना त्या म्हणाल्या की, “या वृत्तांमध्ये तथ्य नाही”. याचाच अर्थ फरहान व शिबानी सध्या मुलाचे प्लॅनिंग करत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र याबाबत फरहान व शिबानी यांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही. पण ८ जानेवारीच्या रात्री दोघेही एकत्र हँग आउट करताना दिसले. शिबानीने तिचा नवरा फरहानच्या वाढदिवसाला पापाराझींसाठी खूप पोज दिल्या.
आणखी वाचा – “हे खरंही असू शकतं आणि…” धनश्री वर्माबरोबरच्या नात्याबद्दल युजवेंद्र चहलचे थेट भाष्य, म्हणाला, “खूप वेदना…”
फरहान व शिबानी यांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाले तर फरहान व शिबानी यांची पहिली भेट ‘आय कॅन डू दॅट’ या रिॲलिटी शोच्या सेटवर झाली होती. फरहान खान होस्ट होता आणि शिबानी स्पर्धक होती. या शोच्या शूटिंगदरम्यान फरहान व शिबानीच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. या दोघांनीही बरेच दिवस आपले नाते जगापासून लपवून ठेवले होते.