Hrithik Roshan And Sussanne Khan Alimony : हृतिक रोशन हा इंडस्ट्रीचा एक देखणा अभिनेता आहे. इतकंच नव्हे तर तो लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिक हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असल्याचे दिसतो. सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. पण तो त्याच्या खासगी आयुष्याविषयी फारशी माहिती देत नाही. अभिनेत्याने आजवर आपल्या शैली, नृत्य आणि अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. हृतिक त्याच्या प्रोफेशनल लाइफबरोबरच वैयक्तिक लाईफबद्दलही खूप चर्चेत असतो. कंगना राणौतबरोबरचे त्याचे अफेअर, ब्रेकअप खूप चर्चेत आले होते. आता तो अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. अनेकदा अभिनेता सबाबरोबर स्पॉट झाला आहे.
हृतिक रोशन हा रेहान व हृधन या दोन मुलांचा पिता आहे. त्यांचे लग्न सुझैन खानशी झाले होते. त्याची लव्हस्टोरी आणि सुझानबरोबरचे लग्न खूपच फिल्मी होते. पण हृतिक व सुझैनने १४ वर्षांचे लग्न संपवण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला. हृतिक रोशनने २००० मध्ये सुझैनशी लग्न केले आणि २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
हृतिक व सुझैनचा घटस्फोटही चर्चेत होता. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, हृतिक व सुझैनचा घटस्फोट हा सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक आहे. सुझैनने ४०० कोटी रुपयांच्या पोटगीची मागणी केली होती. मग कसे तरी प्रकरण ३८० कोटींवर मिटले. मात्र, नंतर हृतिक रोशनने हे सर्व वृत्त फेटाळून लावले होते.
आणखी वाचा – घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहल ‘बिग बॉस १८’मध्ये दिसणार?, नेमकं सत्य काय?
आता हृतिक व सुझैन आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. हृतिक सबाला डेट करत आहे. तर सुजैन खान अर्सलान गोनीला डेट करत आहे. हृतिक सुझैनही आता चांगले मित्र आहेत. दोघेही अनेकदा एकत्र दिसत आहेत. दोघे एकत्र पार्टी करताना आणि सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत. हृतिक व सुझैनदेखील कोविड दरम्यान मुलांबरोबर वेळ घालवण्यासाठी एकत्र राहिले होते. मुलांच्या भवितव्यसाठी ते एकत्र येऊन निर्णय घेताना दिसतात.