गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातील एका क्रिकेटपटूचे नाव सातत्याने समोर येत आहे आणि हे नाव म्हणजे युजवेंद्र चहल. भारतीय संघाचा हा स्टार क्रिकेटपटू त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्यात काही आलबेल नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचा दावा केला जात आहे. तसंच यजुवेंद्र चहलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पत्नीबरोबरचे फोटोही डिलीट केले आहेत. (yuzvendra chahal instagram story)
अशातच आता युजवेंद्र चहलने आपल्या सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. चहलची ही स्टोरी व्हायरल झाली आहे. या स्टोरीतून दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याचा अंदात वर्तवण्यात येत आहे. चहलने या स्टोरीतून स्वत:ला चांगला खेळाडू, चांगला मुलगा, चांगला भाऊ आणि चांगला मित्र असं म्हटलं आहे. मात्र चांगला पती असा उल्लेख न केल्याने आता आता त्याच्या या पोस्टकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर त्याने घटस्फोटाच्या होणाऱ्या चर्चेबाबत हे खरं असू शकतं आणि नाहीसुद्धा, असंही म्हटलं आहे. त्यामुळे त्याचे अनेक चाहते सध्या संभ्रमात आहेत.

चहलने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असं म्हटलं आहे की, “माझ्या सर्व चाहत्यांच्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी मी आभारी आहे, त्याशिवाय मी इथवर पोहचू शकलो नसतो. मात्र हा प्रवास इथे संपलेला नाही. कारण माझा देश, माझा संघ आणि माझ्या चाहत्यांसाठी अजून काही अविश्वसनीय ओव्हर बाकी आहेत. मला एक खेळाडू असण्याबाबत गर्व आहे. तसेच मी एक मुलगा, एक भाऊ आणि एक मित्रही आहे. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडीबाबत लोकांना असलेल्या जिज्ञासेबाबत समजू शकतो. मी सोशल मीडियावर अशा काही पोस्ट पहिल्या आहेत, जे खरंही असू शकतं आणि नाही सुद्धा”…
आणखी वाचा – 10 January Horoscope : मीन, कन्या, मेष या राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस शुभ, अधिक जाणून घ्या…
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “एक मुलगा, एक भाऊ आणि एक मित्र या नात्याने, मी सर्वांना नम्रपणे विनंती करतो की, त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला खूप वेदना दिल्या आहेत. माझ्या कौटुंबिक मूल्यांनी मला नेहमीच सर्वांसाठी शुभेच्छा देण्यास शिकवले आहे, शॉर्टकट न स्वीकारता समर्पण आणि कठोर परिश्रम करून यश मिळवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी या मूल्यांशी वचनबद्ध आहे. मी देवाच्या आशीर्वादामुळे कायमच तुमचं प्रेम आणि समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करेन, पण मला सहानुभूती नको. सर्वांना खूप प्रेम”. दरम्यान, चहलची ही इन्स्टाग्राम स्टोरी आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.