Kangana Ranaut On Rahul Gandhi : अभिनेत्री-दिग्दर्शक आणि भाजप खासदार कंगना रनौत सध्या तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सेन्सॉर प्रमाणपत्रावरुन वाद आणि शीख समुदायाचे चुकीचे चित्रण केल्याच्या आरोपानंतर हा चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. अलीकडेच एका मुलाखतीत कंगनाने संसदेत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्याबरोबर झालेल्या भेटीबद्दल सांगितले. तसेच राहुल गांधींची प्रतिक्रिया काय होती याबद्दलही तिने भाष्य केले. कंगना रनौतला प्रियंकाबरोबरच्या भेटीबद्दल विचारण्यात आले, जिथे तिने तिला चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित केले होते.
याबाबत बोलताना कंगना म्हणाली “मी अलीकडेच या गोष्टीचा उल्लेख केला आहे. हा एवढा मोठा चर्चेचा विषय असल्याने योग्य माहितीसह रेकॉर्डवर ठेवावा लागला. ती एक महत्त्वाची व्यक्ती आणि संसदेतील एक महिला आहे. मला एवढेच म्हणायचे आहे की ती खूप दयाळू आहे. अगदी तिच्या भावापेक्षा (राहुल गांधी). जेव्हा आम्ही संसदेत होतो तेव्हा ती चालत होती आणि मी कोणाला तरी दबक्या आवाजात म्हणताना ऐकले, ‘अरे देवा, तिचे सुंदर केस'”.
आणखी वाचा – “पप्पा जाऊन चार वर्षे झाली पण…”, वडिलांच्या आठवणीत रवी जाधव भावुक, म्हणाले, “त्यांची आठवण…”
कंगनाने टाइम्स नाऊला पुढे सांगितले की, “त्यांनी मला विचारले की संसद माझ्याशी कसे वागते आणि मी त्यांना सांगितले की हे खूपच मनोरंजक आणि माझ्या सवयीपेक्षा खूप वेगळे आहे. मी त्यांना म्हणालो, ‘मी तुझ्या आजी श्रीमती गांधींवर चित्रपट बनवला आहे. ती थोडा विचार करु लागली. मी म्हणाले ‘याला इमर्जन्सी म्हणतात आणि तुम्हाला ते पहायचे आहे. तिच्याकडे खूप बुद्धिमत्ता आहे आणि तिने मला सांगितले की ती मला आणीबाणीबद्दल तथ्य देऊ शकते जी कदाचित मला माहित नसेल”.
ती पुढे म्हणाली, “मला चित्रपट दाखवण्याची संधी द्या आणि तुम्हाला याबद्दल काय वाटते ते पाहून सांगा. याबाबत अधिक माहितीसाठी त्यांनी कॅथरीन फ्रँक यांच्या पुस्तकाचाही उल्लेख केला. त्या संधीचा फायदा घेऊन मी त्यांना सांगू शकले की, मी माझे बहुतेक भाग पुपुल जयकर यांच्या आत्मचरित्रातून घेतले आहेत, जे तुमचे वडील राजीव गांधीजींनी सुरु केले होते. मी त्यांना ते देखील बघायला सांगितले. ती परत हसली आणि ‘हम्म’ म्हणाली. ती तिच्या भावापेक्षा खूप वेगळी आहे. यावर तो नुसता हसला, त्याच्याकडे शिष्टाचार नाही. मी तरीही मी त्याला चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित केले”.
आणखी वाचा – शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर आई-बाबा होणार का?, शबाना आझमी यांनी सांगितलं सूनेच्या गरोदरपणामागील सत्य
राहुल गांधींच्या भेटीबद्दल कंगना म्हणाली, “मी त्यांना सांगितले की त्यांची आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर बनलेला हा चित्रपट पाहावा. तुम्हालाही आवडेल. यावर राहुल माझ्याकडे बघून हसला. आणि तो काही न बोलता निघून गेला. त्याचे हे वागणे मला आवडले नाही. त्याला अजिबात शिष्टाचार नाही”.