शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर आई-बाबा होणार का?, शबाना आझमी यांनी सांगितलं सूनेच्या गरोदरपणामागील सत्य

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 10, 2025 | 10:21 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shibani Dandekar Pregnancy 

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर आई-बाबा होणार का?, शबाना आझमी यांनी सांगितलं सूनेच्या गरोदरपणामागील सत्य

Shibani Dandekar Pregnancy  : फरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकर प्रेग्नंट असून ती लवकरच पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहेत. या बातम्यांवर फरहान किंवा शिबानी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी शबाना आझमी यांनी या चर्चांमागील सत्य सांगितले आहे. या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले असून या चर्चांना एकप्रकारे पूर्णविरामच दिला आहे. शिबानी गरोदर नाही, असं त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे. फरहान व शिबानीने २०२२ साली लग्न केले आणि सोशल मीडियावर अनेकदा रोमँटिक फोटो शेअर केले.

फरहान अख्तरचे पहिले लग्न अधुनाबरोबर झाले होते. अधुना व फरहान यांना दोन मुली आहेत. पण फरहान व अधुना यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. यानंतर त्याने शिबानीशी लग्न केले आणि तो विवाहित आयुष्याचा आनंद घेत आहे. मात्र फरहान व शिबानी यांनी अद्याप स्वत:चा संसार सुरु केलेला नाही. अशात जेव्हा शिबानी प्रेग्नंट असल्याची बातमी आली तेव्हा चाहते त्यांच्याकडे डोळे लावून बसले.

आणखी वाचा – घटस्फोटानंतर हृतिक रोशनला द्यावी लागली होती ३८० कोटी रुपयांची पोटगी, झालेली वाईट अवस्था, आता एक्स पत्नीबरोबर मैत्री अन्…

मात्र, फरहानची सावत्र आई शबाना आझमी यांनी या चर्चांबाबत सर्व काही स्पष्ट केले आहे. ‘इटाइम्स’शी बोलताना त्या म्हणाल्या की, “या वृत्तांमध्ये तथ्य नाही”. याचाच अर्थ फरहान व शिबानी सध्या मुलाचे प्लॅनिंग करत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र याबाबत फरहान व शिबानी यांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही. पण ८ जानेवारीच्या रात्री दोघेही एकत्र हँग आउट करताना दिसले. शिबानीने तिचा नवरा फरहानच्या वाढदिवसाला पापाराझींसाठी खूप पोज दिल्या.

आणखी वाचा – “हे खरंही असू शकतं आणि…” धनश्री वर्माबरोबरच्या नात्याबद्दल युजवेंद्र चहलचे थेट भाष्य, म्हणाला, “खूप वेदना…”

फरहान व शिबानी यांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाले तर फरहान व शिबानी यांची पहिली भेट ‘आय कॅन डू दॅट’ या रिॲलिटी शोच्या सेटवर झाली होती. फरहान खान होस्ट होता आणि शिबानी स्पर्धक होती. या शोच्या शूटिंगदरम्यान फरहान व शिबानीच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. या दोघांनीही बरेच दिवस आपले नाते जगापासून लपवून ठेवले होते.

Tags: bollywood newsfarhan akhtar and shibani dandekarShibani Dandekar Pregnancy
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kangana Ranaut  On Rahul Gandhi

"राहुलला शिस्त नाही", कंगना रनौतने प्रियंका व राहुल गांधींना 'इमर्जन्सी' पाहण्यास केलं आमंत्रित, भावा-बहिणीकडून मिळालं 'हे' उत्तर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.