बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा त्याच्यावरील हल्लेमुळे चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्यावर राहत्या घरी हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर त्याने हल्लेखोराशी दोन हात करत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्याच्या कुटुंबियांना वाचवले. मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. इतका मोठा हल्ला झाला तेव्हा सुरक्षा यंत्रणा, सुरक्षा कर्मचारी कुठे होते? असं म्हटलं गेलं. याशिवाय ज्यावेळी सैफवर हल्ला झाला त्याक्षणी त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर घरी नव्हती. तर काही जणांचं असंही म्हणणं होतं की, करीना घरी होती, पण ती सैफला मदत करु शकली नाही. या प्रकरणी असे अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. (twinkle Khanna on kareena kapoor trolls)
अनेकांकडून करीनावर टीकाही करण्यात आली. त्यावर आता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने आपली प्रतिक्रिया देत ट्रोलर्सना चांगलंच धारेवर धरलं आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरवर टीका करणाऱ्यांचा ट्विंकल खन्नाने खरपूस समाचार घेतला आहे. शिवाय अनेक उदाहारणंदेखील तिने दिली आहेत. याबद्दल तिने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ट्विंकलने करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घटनेवर भाष्य करताना म्हटले की, “सैफवर हल्ला झाला त्यावर करीनाबद्दलच्या निराधार चर्चा हास्यास्पद आहेत”.
आणखी वाचा – “संन्यासानंतरही अभिनय करणार का?”, ममता कुलकर्णीने दिलं उत्तर, म्हणाली, “चित्रपटसृष्टीत परतणे माझ्यासाठी…”
पुढे ट्विंकल असं म्हणाली की, “अभिनेत्याला भोसकल्यानंतर, हास्यास्पद अफवा पसरल्या की, त्याची पत्नी घरी नव्हती किंवा मारहाणीच्या वेळी त्याला मदत करु शकली नाही कारण ती खूप मद्यधुंद अवस्थेत होती. लोकांना फक्त बायकोवर दोष ढकलण्यात आनंद झाला. जेव्हा बीटल्सचे विभाजन झाले तेव्हा लोकांनी योको ओनोला दोष दिला. जो यांना त्यांची मोहीम सुरू ठेवण्यासाठी जिल बिडेन यांना जबाबदार धरण्यात आले आहे. विराट कोहली आऊट झाल्यावर अनुष्काला दोष देण्यात आला”.
आणखी वाचा – सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिस पश्चिम बंगालमध्ये दाखल, हल्लेखोराला मदत करणाऱ्याचा घेणार शोध
यापुढे ती म्हणाली की, “ही एक व्यापक समस्या आहे. लोकांच्या नजरेत असलेल्या जोडप्यांपुरती मर्यादित नाही. जर तुमच्या पतीचे वजन खूप वाढले असेल तर तुम्ही त्याच्या आरोग्याची काळजी घेत नाही; जर त्याने खूप किलो वजन कमी केले तर तुम्ही त्याला चांगले खायला देत नाही. जर तो काळजी घेत असेल, तर ते दावा करतील की तुम्ही नीट सांभाळले आहे; जर तो उदास असेल, तर ते तुम्ही त्याच्याकडे नीट लक्ष देत नसल्याबद्दल तुम्हाला दोष देतील”.