‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’, ‘वक्त हमारा’ है आणि ‘क्रांतिवीर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ९०च्या दशकातली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी. २००१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘छुपा रुस्तम’ हा तिचा शेवटचा हिट चित्रपट होता. यानंतर तिने २००२ मध्ये आलेल्या ‘कभी हम कभी तुम’ या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्राला कायमचा अलविदा केला आणि केनियाला गेली. त्यानंतर तब्बल २४ वर्षांनी अभिनेत्री पुन्हा भारतात परतली. अशातच तिने नुकताच संन्यासही घेतला. २४ जानेवारी रोजी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात संपूर्ण विधीवत अभिषेकानंतर तिने आपल्या संन्यासाची घोषणा केली आणि नावही बदलले. (Mamta Kulkarni replied on will you act after sannyas)
ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. २४ जानेवारी रोजी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात संपूर्ण विधीवत अभिषेकानंतर तिने ही पदवी धारण केली. अभिनेत्री आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे. यामुळे भविष्यात ती कधी अभिनय करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिने “चित्रपटसृष्टीत परतणे माझ्यासाठी अकल्पनीय आहे. माझे संपूर्ण लक्ष अध्यात्मावर आहे”. असं म्हटलं. ‘इंडिया टुडे’शी बोलताना ममता कुलकर्णी म्हणाली की, “मी पुन्हा चित्रपटात काम करण्याचा विचारही करू शकत नाही. आता हे माझ्यासाठी पूर्णपणे अशक्य आहे”.
आणखी वाचा – सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिस पश्चिम बंगालमध्ये दाखल, हल्लेखोराला मदत करणाऱ्याचा घेणार शोध
‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत ममताने असं सांगितलं की, “हो, मी नुकताच बॉलिवूडला निरोप दिला आहे.’ तरीही, मला कोणत्याही धार्मिक परिषदेत उपस्थित राहण्याचे किंवा कोणतेही पात्र साकारण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. मी कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ शकते”. तसंच यापुढे तिने स्वत:च्या आध्यात्मिक प्रवासाचे वर्णन अत्यंत आनंददायी असल्याचे सांगितले आणि किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर होण्याच्या तिच्या सन्मानाची तुलना २३ वर्षांच्या भक्तीनंतर ऑलिम्पिक पदक जिंकण्याशी केली.
दरम्यान, प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यादरम्यान ममता कुलकर्णीने संगम येथे पवित्र पिंड दान केले आणि तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद देण्यात आले. तेव्हापासून तिने ‘श्री यमाई ममता नंद गिरी’ हे नाव धारण केले आहे आणि एक आध्यात्मिक नेता म्हणून तिची नवीन भूमिका स्वीकारली आहे.