Salman Khan On Malaika And Arbaaz Divorce : सुपरस्टार सलमान खानने आजवर जगभरात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सलमान बरेचदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. ‘बिग बॉस’ हिंदीनंतर आता सलमान पहिल्यांदाच एका पॉडकास्टमध्ये खुलेपणाने बोलताना दिसला. त्याने नुकतीच मलायका अरोरा आणि अरबाझ खानचा मुलगा अरहान खान यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टचे नाव मुका बिर्याणी असे आहे. सलमान खानने पुतण्या अरहानशी त्याच्या मनातील बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. त्याने त्याला कौटुंबिक मूल्ये शिकविली आणि हिंदी भाषेचे महत्त्वही यावेळी सांगितले. तर या शोमध्ये सलमान खानने मलायका अरोरा आणि अरबाझ खान यांच्या घटस्फोटावर भाष्य केले.
सलमानने अरहानला समजावून सांगितले की त्याने त्याच कुटुंब हे स्वतः बनवावे आणि स्वत: च्या मार्गाने आयुष्य जगावे, असा सल्ला दिला. सलमानने अरहानकडे लक्ष वेधले आणि तो म्हणाला, “हे मूल बऱ्याच चढ-उतारांमधून आले आहे. आपल्या आई आणि वडिलांच्या घटस्फोटानंतर, त्याला स्वतःसाठी सर्व काही करावे लागले. एक दिवस आपले कुटुंब आणि युनिट असेल. म्हणून आपले कुटुंब तयार करण्यासाठी आपल्याला या गोष्टींवर कार्य करावे लागेल. दुपारचे जेवण, कुटुंबासह जेवणाची संस्कृती बनविणे आवश्यक आहे आणि कुटुंबात नेहमीच एक असे डोके असले पाहिजे ज्याचा आदर केला पाहिजे”.
मलायका अरोरा आणि अरबाझ खान यांनी १९९८ मध्ये लग्न केले. त्यांचे लग्न 20 वर्षे टिकले. त्यानंतर २०१७ मध्ये, दोघेही विभक्त झाले. त्याच्या वेगळे होण्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. अरहानचा जन्म २००२ मध्ये झाला होता. आता मलायका आणि अरबाझ एकत्र पालकत्व सांभाळतात. दोघेही त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या मार्गांवर गेले आहेत.
अरबाझपासून विभक्त झाल्यानंतर, मलायका हिचे नाव अर्जुन कपूरशी जोडले गेले. दोघांचेही घट्ट नाते होते. मात्र, आता मलायका व अर्जुन दोघेही विभक्त झाले आहेत. मलायका आणि अर्जुनच्या विभक्ततेमुळे चाहत्यांची मने दुखावली आहेत. त्याच वेळी, अरबाझ खानने दुसरे लग्न केले आहे. त्याने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी लग्न केले. अरबाझ आणि शुराचे लग्नही चर्चेत होते.