Kareena Kapoor Emotional Post : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री तिचा पती सैफ अली खान त्याच्यावरील हल्ल्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये हल्ल्याबद्दल तिने काहीही सांगितले नव्हते. त्याऐवजी, यामध्ये करीनाने आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांबद्दल सांगितले. त्यात म्हटले आहे की, काळाबरोबर कोणासाठीही गोष्टी बदलू शकतात. करीनाने लग्न आणि घटस्फोटासारख्या गोष्टींची यादी केली आहे. त्यानंतर चाहत्यांनी विचारायला सुरुवात केली की नेमकं काय प्रकरण आहे.
करीना कपूरने पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, ज्यामध्ये लिहिले होते, “तुम्ही लग्न, घटस्फोट, चिंता, बाळंतपण, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, पालकत्व या गोष्टींना कधीच समजू शकत नाही. जोपर्यंत तुमच्याबरोबर प्रत्यक्षात घडत नाही तोपर्यंत तुम्हाला कधीही समजणार नाही, जीवनातील परिस्थितींबद्दलचे सिद्धांत आणि धारणा वास्तव नसतात. तुमची वेळ येईपर्यंत आयुष्य तुम्हाला नम्र करत नाही तोपर्यंत तुम्ही इतरांपेक्षा हुशार आहात असे तुम्हाला वाटते”.
आणखी वाचा – “मला जावेसे वाटत आहे”, अमिताभ बच्चन यांचं त्रासदायक ट्विट, चाहते काळजीत, म्हणाले, “बस करा…”

करीना कपूरची ही पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली आणि चाहते तिला काळजीत विचारु लागले की नेमके काय झाले आहे. विशेषतः करीना कपूरने लग्न आणि घटस्फोट असे टॅग केले, ज्यामुळे प्रत्येकजण विचारत आहे की सर्व काही ठीक आहे की सैफबरोबर काही समस्या आहे. करीना आणि तिचे कुटुंब अलीकडेच चर्चेत आले होते जेव्हा तिचा पती सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी चाकूने हल्ला करण्यात आला. सैफवर सहा शस्त्रक्रिया झाल्या आणि सध्या तो बरा आहे. तो रुग्णालयातून घरी परतला आहे.
आणखी वाचा – चाहतीने मृत्यूपूर्वी संजय दत्तच्या नावावर केली ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता, किंमत ऐकून व्हाल थक्क
हल्ल्यानंतर, करीनाने सोशल मीडियावर एक विधान शेअर केले होते ज्यामध्ये लिहिले होते, “आमच्या कुटुंबासाठी हा एक आव्हानात्मक दिवस होता आणि आम्ही अजूनही घडलेल्या घटनांना तोंड देण्याचा प्रयत्न करत आहोत. या कठीण काळातून जात असताना, मी आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती करतो की मीडिया आणि पापाराझी सतत अनुमान आणि कव्हरेज करण्यापासून दूर राहावेत”. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, करीना कपूर शेवटची हंसल मेहता दिग्दर्शित ‘द बकिंघम मर्डर्स’ चित्रपटात दिसली होती.