Mamta Kulkarni Mahamandaleshwar : ममता कुलकर्णी यांनी महाकुंभमेळ्यात संन्यास घेतला. त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद देण्यात आले होते. पण शुक्रवारी किन्नर आखाडा व महामंडलेश्वर पदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली. ममता कुलकर्णीबरोबरच तिला महामंडलेश्वर करणाऱ्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आखाड्यातून काढलं. या घडामोडीनंतर ममता कुलकर्णी चर्चेत राहिल्या आहेत. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीवर कारवाई केली आहे आणि महामंडलेश्वर होण्यासाठी ममता यांनी १० कोटी दिले आहेत, असाही अहवाल देण्यात आला आहे. आता या अहवालांवर ममताने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आप कोर्टात हा अहवाल नाकारताना ममता यांनी त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल भाष्य केले आहे.
या चर्चेनंतर ममता कुलकर्णी म्हणाल्या, “माझ्याकडे १० कोटी काय तर किमान १ कोटीही नाहीत. सरकारने माझे मागील खाते ताब्यात घेतले आहे. मी कसे जगत आहे हे तुम्हाला माहित नाही. माझ्याकडे पैसे नाहीत. मी खूप त्याग केला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मी खूप सहन करत आहे. कोणाकडून तरी मी दोन लाख रुपये उधार घेतले जे गुरु दक्षिणा देण्यासाठीचे होते”. हे सर्व बोलताना ममता भावुक झाली आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला.
ममता कुलकर्णी पुढे म्हणाली की, “माझे तीन अपार्टमेंट वाईट स्थितीत आहेत. पूर्णतः खराब झाले आहेत कारण ते गेल्या २३ वर्षांपासून बंद आहेत. मी ज्या आर्थिक संकटातून जात आहे त्याबद्दल मी सांगू शकत नाही”. ममताबद्दल बोलायचं झालं तर, १९९० च्या दशकात तिने चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला. १९९२ मध्ये तिने पदार्पण केले. ती ‘तिरंगा’ चित्रपटात दिसली. यानंतर, ममताने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले.
आणखी वाचा – “फक्त प्रसिद्धीसाठी आमचा वापर”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, “खूप दुर्दैवी…”
‘वो वक्त हमारा है’, ‘क्रांतिवीर’, ‘करण अर्जुन’, ‘सबसे बड़ा खिलाड़ी’ या चित्रपटांमध्ये दिसली. अभिनयातून त्याला खूप फेम मिळाली. पण त्यानंतर ममताने २००० मध्ये चित्रपटसृष्टीला रामराम केला आणि तिने भारत देशही सोडला आणि ती परदेशात स्थायिक झाली. त्यानंतर आता ती २५ वर्षानंतर भारतात परतली आहे.