सोनू निगम हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. आजही त्यांची गाणी प्रेक्षकांना खूप आवडतात. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. तर, त्याने अनेक गाण्याच्या शोचे परीक्षणही केले आहे. सोनू निगम हा केवळ गायकच नाही तर तो उत्तम सादरकर्तादेखील आहे. त्याच्या गाण्याचे अनेक लाईव्ह शोज होत असतात आणि या लाईव्ह शोजमधून सोनू निगम रसिकांना मंत्रमुग्ध करतो. अशातच एका लाईव्ह शो दरम्यान त्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीबद्दलची माहिती स्वत: गायकाने दिली आहे. सोनू निगमने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबद्दल सांगितलं आहे. (Sonu Nigam back injury)
सोनू निगमने व्हिडीओ शेअर करत म्हटले की, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस आहे, पण त्यानंतर मला चांगले दिवस आले. गाताना माझ्या पाठीवर जोरदार आघात झाला, तो वेदना त्याला सहन होत नाही, हे त्याने सांगितले. मला खूप वेदना होत होत्या, माझ्या मणक्यात सुई टोचल्यासारखे वाटत होते आणि ती थोडी जरी सरकली असती तर ती मणक्यात गेली असती. लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आता मी सावरलो आहे”.
आणखी वाचा – Grammy 2025 Award Winners List : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचा बोलबाला, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
पुढे त्याने असं म्हटलं आहे की, “हे खूप वेदनादायक आहे, आजपर्यंत शोमध्ये मला इतक्या वेदनांचा त्रास कधीच झाला नाही. काही लोकांनी हे वर्ष अपघात आणि वैद्यकीय समस्यांनी भरलेले असेल असे भाकीत केले होते. मला वाटते ते बरोबर आहेत. मी पुण्यात अशाच परिस्थितीमध्ये रंगमंचावर जात आहे. हे प्रत्येकाला मजेदार वाटते, परंतु सरस्वतीजींनी माझा हात धरला होता”. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सोनू निगम मसाज घेत आहे. मसाजनंतर सोनूनं पुण्यात आपला संगीत कार्यक्रमही सादर केला. कॉन्सर्टमध्ये सोनू निगम हा छान दिसत होता.
दरम्यान, सोनूनं आतापर्यंत ८०० हून अधिक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. पद्मश्रीनं सन्मानित झालेला सोनू निगम आजही संगीताच्या जगात खूप सक्रिय आहेत. त्याची अनेक गाणी ही लोकप्रिय झाली आहेत. सोनू निगम अनेकदा संगीत रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसतो.