Bhagyashree Gets Injured : अभिनेत्री भाग्यश्रीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्रीला गंभीर दुखापत झाली आहे. पिकलबॉल खेळत असताना तिच्या कपाळाला गंभीर दुखापत झाल्याने तिला तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. दुखापत इतकी खोल होती की भाग्यश्रीवर तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागली आणि तिच्या कपाळावर १३ टाके पडले. हॉस्पिटलमधून अभिनेत्रीचे काही फोटो समोर आले आहेत. समोर आलेल्या एका फोटोमध्ये भाग्यश्री बेडवर पडली असून डॉक्टर तिला टाके घालताना दिसत आहेत. तर दुसऱ्या छायाचित्रात भाग्यश्रीच्या कपाळावर खोलवर झालेली दुखापत स्पष्टपणे दिसत आहे. आणखी एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये भाग्यश्रीच्या कपाळावर पट्टी बांधलेली आहे आणि ती हसत आहे.
भाग्यश्रीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत आणि अभिनेत्रीने लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहे, तर चाहतेमंडळी तिच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. या पोस्टखाली एकाने लिहिले आहे की, “अहो, भाग्यश्रीजी लवकर बरे व्हा. स्वतःची काळजी घ्या”. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “लवकर बरे व्हा”. तर आणखी एकाने कमेंट करत म्हटलं की, “हे खरोखर माझे लक्ष वेधून घेत आहे. लवकर बरे व्हा”.
आणखी वाचा – ऐश्वर्या नारकरांची होणारी सून दिसते इतकी सुंदर, लग्नाबाबत प्रश्न विचारताच दिलं उत्तर, म्हणाली, “सध्या तो…”
असे सांगितले जात आहे की भाग्यश्री पिकबॉल खेळत होती आणि त्या काळात तिला तिच्या कपाळावर तीव्र दुखापत झाली होती, ज्यात शस्त्रक्रिया करावी लागली. भाग्यश्रीच्या व्यावसायिक आघाडीबद्दल बोलायचे झाले तर १९८९ मध्ये सुपरहिट पदार्पणानंतर चित्रपटांना निरोप दिला. पण २०२१ मध्ये कंगना रनौतच्या ‘थलाइवी’तून कमबॅक केलं. यानंतर ती प्रभास स्टारर ‘राधे श्यान’ मध्ये दिसली. २०२३ मध्ये भाग्यश्रीला ‘सजनी शिंदे का वायरल वीडियो’ मध्ये दिसली.