Isha Sanjay Reation : मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकार मंडळी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. बरेचदा लाईव्ह येत वा आस्क मी सेशनद्वारे ते चाहत्यांशी संवादही साधतात. अशातच सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रींच्या आस्क मी सेशनची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. कारण अभिनेत्रीला विचारण्यात आलेल्या या सेशनमध्ये तिने दिलेल्या उत्तराने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली इशा संजयच्या उत्तराची सध्या चर्चा सुरु आहे. लाखात एक आमचा दादा या मालिकेत नितीश चव्हाण मुख्य भूमिकेत आहे. पाच भावंडांभोवती फिरणारी ही कथा आहे. या मालिकेत इशा बहिणीपैकी राजश्री हे पात्र साकारत आहे.
ईशाने ‘आस्क मी सेशन’मध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लक्षवेधी ठरत आहे. यावेळी अभिनेत्रीने खुलासा करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून इशा ही अमेय नारकर म्हणजेच ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या मुलाला डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र यावर त्यांच्यापैकी कोणीही अधिकृतपणे काहीही खुलासा केला नाही. मात्र आता इशाने चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. हे प्रेम व्यक्त करताना तिने अमेय बरोबरचा फोटो शेअर केला आहे.

“तुझं लग्न झालंय का दीदी?” असा प्रश्न चाहत्याने इशाला विचारला. यावर उत्तर देत अभिनेत्रीने अमेय बरोबरचा फोटो शेअर केला आणि म्हणाली, “लग्न नाही झालंय कारण, कोणीतरी खूप दूर आहे सध्या”, असं म्हणत अमेयला टॅगही केलं आहे. अभिनेत्रीच्या या स्टोरीवरुन दोघंही लाँग डिस्टंस रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेय शिक्षणासाठी अमेरिका येथे गेला. अमेय परदेशात दिग्दर्शन शिकण्यास गेला आहे. त्यामुळे इशाने अमेय तिच्यापासून लांब असल्याचं म्हटलं आहे.
आणखी वाचा – माथी नवरा गेल्याचा कलंक, सासरच्यांचा जाच; ‘ति’ची अशीही होळी
तर इशाने आणखी एका स्टोरीमध्ये चाहत्याने अमेय आणि तिच्या आवडत्या फोटोबद्दल विचारले असता उत्तर दिलं आहे. इशा म्हणाली, “खूप आहेत, एखादा निवडू शकत नाही”, असं म्हटलं. इशा आणि अमेय गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांचे एकत्र अनेक फोटोही त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. अमेयला अभिनय, नृत्याची आवड बालपणापासून आहे. रुईया महाविद्यालयातून त्याने बी.एम.एम.मधून (संज्ञापन आणि माध्यम विभाग) शिक्षण घेतलं आहे.