Aishwarya Rai Abhishek Bachchan Video : गेल्या एका वर्षापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सतत कानावर येत होत्या आणि याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. मात्र या जोडप्याने या अहवालांवर कधीही प्रतिक्रिया दिली नाही, परंतु त्यांचे हावभाव, सार्वजनिक वा कौटुंबिक कार्यांनिमित्त एकत्र येणे यादरम्यानच्या बारीक सारीक चुकांवर नेटकरी लक्ष ठेवून असत. आणि एखादी चूक मिळताच दोघांच्या घटस्फोटाची बातमी व्हायरल होत. असं असलं तरी बरेचदा ही जोडी एकत्र स्पॉट झालेली पाहायला मिळाली. अलीकडेच दोघेही कौटुंबिक लग्नाला उपस्थित राहिले, यावेळचे त्यांचे फोटो व्हायरल झाले. दरम्यान, आता ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा या लग्नसोहळ्यात एक व्हिडीओ समोर आला आहे.
या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या व अभिषेक एकत्र थिरकताना दिसत आहेत. यावेळी दोघांनीही ‘कजरा रे’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. मजेदार गोष्ट अशी आहे की यावेळी मुलगी आराध्या देखील होती. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक यांनी यावेळी मुलगी आराध्याबरोबर ‘कजरा रे’ या गाण्यावर थिरकताना दिसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो ऐश्वर्याच्या चाहत्यांनी शेअर केला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी त्याच लग्नात हे नृत्य सादर केले ज्यामध्ये त्यांनी कुटुंबासह हजेरी लावली. यावेळी ऐश्वर्याच्या आईनेही डान्स केला.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधील दयाबेन सापडली?, चर्चांदरम्यान अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली, “ऑडिशन दिलं…”
हा व्हिडीओ पाहून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या चाहत्यांना आनंद झाला. दोघांना एकत्र पाहून नेटकऱ्यांची, ट्रोलर्सची बोलतीही बंद झाली. जे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्यातील संघर्षाबद्दल त्यांच्या घटस्फोटाबद्दल बोलत होते. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी पुण्यात झालेल्या नातेवाईकांच्या लग्नात तुफान धमाल केली. निऑन ग्रीन कलर अनारकलीमध्ये ऐश्वर्या खूप सुंदर दिसत होती.
आणखी वाचा – राज ठाकरे व सयाजी शिंदेंच्या म्हणण्यानुसार अंत्यविधीला लाकूड न वापरणं कितपत योग्य?, परिणाम काय होईल?
त्याच वेळी, आराध्या हिने देखील या कौटुंबिक कार्यात महफिल लुटली. आई ऐश्वर्याबरोबरच आराध्याचे अनेक फोटोदेखील व्हायरल होत आहेत आणि प्रत्येकजण तिच्या शैलीबद्दल बोलत आहेत. पांढर्या रंगाच्या ड्रेसमध्ये आराध्या खूप सुंदर दिसत होती. आराध्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहून ती किती मोठी झाली हे पाहून नेटकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं.