Shalini Pandey : सिनेविश्वात असे अनेक किस्से कानावर येत असतात ज्यात अनेकदा महिला कलाकारांना कास्टिंग काऊचसारख्या घटनांना सामोरे जावे लागते. अनेकदा या महिला कलाकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करत सहन करतात, तर काहीवेळेस त्या या वाईट गोष्टीवर आवाज उठवतात. अशातच दाक्षिणात्य अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका निवेदनात तिला आलेल्या कास्टिंग काऊचबाबत भाष्य केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे शालिनी पांडे. शालिनीने तिच्या सिनेविश्वातील कारकिर्दीच्या काळात आलेल्या कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्रीने, तिच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करुन, दक्षिण दिग्दर्शकाची एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आणली.
अभिनेत्रीने हा खुलासा करत म्हटलं की, एके दिवशी ती व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपडे बदलत होती. यावेळी दिग्दर्शक न विचारता थेट आत आला. शालिनी पांडे तिच्या अभिनय कारकीर्दीबद्दल आणि चित्रपटसृष्टीतील अनुभव आणि संघर्षाबाबत एका मुलाखतीत उघडपणे बोलली. यावेळी, अभिनेत्री म्हणाली की, “मी कधीच चांगल्या पुरुषांसह काम केले नाही. मी ऑन-स्क्रीन, ऑफ-स्क्रीन आणि क्रू यासह काही भयानक पुरुषांसह देखील काम केले आहे. परंतु आपल्याला फक्त आपल्या मर्यादा सेट कराव्या लागतील. माझ्या कारकीर्दीत, मी खूप गोंधळलेल्या पुरुषांचा सामना केला आहे आणि हे अगदी खरे आहे”.
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी कोणत्याही चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर नाही, म्हणून मला सुरुवातीला गोष्टी हाताळण्यास कठीण जात होते. एकदा माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीस, मी दाक्षिणात्य चित्रपटात काम करत होते. त्यावेळी सेटवर चित्रपटाचा दिग्दर्शक माझ्या व्हॅनमध्ये दार ठोठावल्याशिवाय आत आला. आणि तेव्हा मी कपडे बदलत होते. त्यांना अचानक आत आलेले पाहून मी खूप घाबरले. पण नंतर मी दिग्दर्शकावर खूप ओरडले, त्यावेळी माझ्या कामावर याचा परिणाम होईल याचा मी जराही विचार केला नाही”.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधील दयाबेन परतली?, चर्चांदरम्यान अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “ऑडिशन दिलं…”
अभिनेत्री पुढे म्हणाली की, “त्यावेळी मी फक्त २२ वर्षांची होती. सेटवरील माझ्या इतर सहकलाकारांनी मला सांगितले की तिने त्यांच्यावर ओरडायला नको होते. पण हा मार्ग नाही. मी नवीन असल्याने व्हॅनिटीच्या आत येतानादार ठोठावलं नाही हे चूक आहे. तसे माझ्याबरोबर कोणी वागू शकत नाही”.