गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. अनेक चित्रपटांनी मोठ्या प्रमाणात लोकप्रियतादेखील मिळवली आहे. काही चित्रपटगृहात तर काही ओटीटीवरदेखील जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या वर्षी म्हणजे २०२५ च्या जानेवारी महिन्यात दुसऱ्या आठवड्यात ओटीटीवर क्राइमपासून कॉमेडी व उत्खंठवर्धक सीरिज प्रदर्शित होणार आहेत. या वेबसीरिजचा आनंद तुम्ही घरबसल्या घेऊ शकता. तर आता या नक्की कोणत्या वेबसीरिज आहेत? हे आपण जाणून घेऊया. (ott movie release)
धीरज सरना यांनी दिग्दर्शित केलेला पॉलिटीकल ड्रामा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट खूपच लोकप्रिय ठरला. या चित्रपटात विक्रांत मेस्सी, राशी खन्ना, रिद्धि डोगरा यांच्या मुख्य भूमिका दिसून आल्या आहेत. हा चित्रपट एका पत्रकारावर आधारित आहे. हा चित्रपट २००२ साली गुजरातमधील गोध्रा ट्रेन अग्निकांडवर आधारित आहे. काही वर्षांनी एका पत्रकाराला एक लपवलेला रिपोर्ट मिळतो. हा पत्रकार काही मोठ्या लोकांचा पर्दाफाश करतो. हा चित्रपट ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १० जानेवारी रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

त्यानंतर विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित सीरिज ‘ब्लॅक वॉरंट’ या सीरिजमध्ये जहान कपूर, राहुल भट्ट, परमवीर सिंह चिमा, अनुराग ठाकूर व सिद्धांत गुप्ता यांच्यासहित अनेक कलाकार दिसून येणार आहेत. ही सीरिज तिहार जेलवर आधारित आहे. ही सीरिज १० जानेवारी रोजी ‘नेटफ्लिक्स’वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.‘फ्रेंड्स’ फेम डेव्हिड श्विमर यांची मुख्य भूमिका असणारा ‘गुजबंप्स द व्हॅनिशिंग’ हा भयपट १० जानेवारी रोजी हॉटस्टारवर १० जानेवारी रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.
ट्रॉयन बॅलिसारियो, ब्रॅंडन लाराकुंते व एरिकला सॅले यांची भूमिका असणारा ‘ऑन कॉल कॅलिफोर्निया’मधील दोन पोलिस अधिकारी ट्रेसी हार्मन व अलेक्स डियाज यांची गोष्ट आहे. हा चित्रपट ९ जानेवारी रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. पीटर एगर्स व मॅटियास नॉर्डकविस्टचे ब्रेकथ्रू एक नॉन फिक्शन बुकवर आधारित आहे. ही एक क्राइम थ्रीलर आहे. यामध्ये दुहेरी हत्याकांड दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट ७ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.