बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान हा नेहमी चर्चेत असलेला बघायला मिळतो. सध्या तो चित्रपटांमध्ये दिसून येईल अशी चर्चादेखील बघायला मिळते. त्यामुळे लोक आता त्याच्या पहिल्या चित्रपटाची वाट त्याचे चाहते बघत आहेत. मात्र चित्रपटांपेक्षा तो त्याच्या व्हायरल व्हिडीओमुळे अधिक चर्चेत असतो. तो नेहमी पापाराझीबरोबर गप्पा गोष्टी करतानाही दिसतो. मात्र यावेळी तो त्याच्या एका नवीन व्हिडीओमुळे अधिक चर्चेत आला आहे. त्याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो एका गाईबरोबर दिसून येत आहे. (ibrahim khan viral video)
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये इब्राहिमच्या समोर गाय व त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्तीबरोबर तो बोलताना दिसत आहे. त्यावेळी तो विचारतो की, “लक्ष्मीजी, काय हवं आहे तुम्हाला?”, त्यावर ती व्यक्ती म्हणाली की, “आज सबजी डे आहे”. इब्राहिमणए तिथे असलेल्या पापाराझीना मोजलं आणि म्हणाला आठ जण आहेत इथे त्यांना द्या”. त्यावर तो व्यक्ती म्हणतो की, “तुम्ही द्या. तुम्ही मोठे अभिनेते आहात”. त्यावर इब्राहिम म्हणाला, “मी कुठे मोठा अभिनेता आहे?”, त्यावर तो व्यक्ती म्हणाला की, “तुमचे वडील खूप मोठे अभिनेते आहेत”.
हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की, “गरीब आहे. एक रुपयापण नाही काढला खिशातून”. तसेच अजून एक नेटकरी म्हणाला की, “हा सैफ अली खानचा मुलगा आहे. नाहीतर हा काहीच नाही”.
आणखी वाचा – Navri Mile Hitlarla : लीलाचा धांदरटपणा एजेंच्या पंसतीस, सूनांची फजिती, प्रोमो व्हायरल
इब्राहिम सध्या ‘सरजमीन’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. यामध्ये काजोल व दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकार दिसणार आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, तो ‘जन्नत’ व ‘शिद्दत’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. तसेच ‘नादानिया’ या चित्रपटातही खुशी कपूर, सुनील शेट्टी व दिया मिर्झा यांच्याबरोबर दिसणार आहे.